मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा भिडे वाड्यात सुरू केली होती. या वास्तूचे संवर्धन व्हावे आणि हा वाडा राष्ट्रीय स्मारक बनावा, यासाठी पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फार सुरवातीपासून प्रयत्नशील होती. आज उच्च न्यायालयाने ही भिडेवाड्याची जागा स्मारकासाठी देण्याच्या बाजूने निकाल दिला असून पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
भिडेवाडा संदर्भातील उच्च न्यायालयातील खटला पुणे महापालिकेने पर्यायाने महायुती सरकारने जिंकला असून सरकारच्या लढ्याला मोठं यश आलं आहे. या पार्श्वभूमीवर भिडे वाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह जल्लोषात या निर्णयाचे स्वागत केले.
स्त्री शिक्षणाचे उद्धारकर्ते महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी अनेक हालअपेष्टा सहन करून स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री शिक्षणाचं महान कार्य केलं. हे स्मारक राज्यातीलच नव्हे तर देशातील महिलांचे प्रेरणास्थान ठरेल, हे नक्की.


Post a Comment
0 Comments