Type Here to Get Search Results !

हिंदीला सन्मान देण्याचा सरकारी पातळीवर पहिल्यांदाच प्रयत्न जी-20 परिषदेतही सर्व राष्ट्रप्रमुखांकडून हिंदीची वाखाणणी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हिंदीतील भाषणाचे कौतुक: श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय राजभाषा परिषदेत गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचे प्रतिपादन

 


देशात अनेक भाषा बोलल्या जातात.आपल्या हिंदी आणि भारतीय भाषा यांच्यात  कधीच स्पर्धा नव्हती. या देशाला सर्व भाषांमधील  साहित्य आणि ज्ञानाची परंपरा आहे आणि या सर्व भाषांना अतिशय समृद्ध भाषा म्हणून स्वतःची ओळख आहे.

आपल्याकडे जी 20 चे आयोजन करण्यात आले. त्यापूर्वी गृहमंत्र्यांनी संसदीय राजभाषा समितीची बैठकही घेतली होती. या बैठकीत आपल्याला गुलामगिरीच्या खुणा पुसून टाकायच्या आहेत. आपली संस्कृती, आपली भाषा  यांना गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी  आपण काम केले पाहिजे, यासह  पंच प्रण शपथ  घेण्यात आली.याची प्रचीती  आपल्याला  जी-20 परिषदेत पाहायला मिळाली . जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधान जेव्हा हिंदीत  भाषण करत  होते, तेव्हा वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतराची व्यवस्था होती, पण त्या परिषदेत उपस्थित  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह अनेक लोक  पंतप्रधानांचे हिंदीतील भाषण अतिशय लक्षपूर्वक ऐकत होते.जी -20 मधील अनेकांनी काही हिंदी शब्दात पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.

   

कोणत्याही समाजाची प्रगती मातृभाषेच्या उन्नती शिवाय शक्य नाही आणि  मनातील वेदना दूर करण्यासाठी भाषा महत्त्वाची आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले. स्वतःच्या भाषेत काम करण्याचा आनंद इतर कोणत्याही भाषेत काम करताना मिळू शकत नाही , असे त्या म्हणाल्या.   आज येथे अखिल भारतीय स्तरावर हिंदी दिन साजरा होत आहे ही आनंदाची बाब आहे . सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करतानाच भविष्यातही सर्व विभागांनी हिंदीत काम करण्यास प्राधान्य द्यावे, असे डॉ.भारती पवार म्हणाल्या.

कार्यक्रमादरम्यान राजभाषा हिंदीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागांना राजभाषा कीर्ती पुरस्कार आणि राजभाषा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी कंठस्थ 2.0 च्या  एकात्मिक आवृत्तीचाही प्रारंभ करण्यात आला आणि यासोबतच सिंधू या हिंदी शब्दाची  नवीन शब्दावली  प्रकाशित करण्यात आली  ज्यात  3 लाख 50 हजार नवीन शब्दांची भर आहे.  

कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे उपस्थितांना संबोधित केले आणि हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments