मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
३५ वा पुणे फेस्टिव्हल ‘इंद्रधनू’साठी अर्ज उपलब्ध
३५ वा पुणे फेस्टिव्हल सार्वजनिक गणेशोत्सव कालावधीत संपन्न होत असून वय १८ ते २८ वर्षे या वयोगटातील कलाकारांसाठी ‘इंद्रधनू’ कार्यक्रमाचे दरवर्षीप्रमाणे आयोजन करण्यात आले आहे. नृत्य, गायन, वाद्यवादन इ. कला सादर करण्याची संधी या कार्यक्रमाद्वारे युवा कलाकारांना मिळत असते. यंदा पुणे फेस्टिव्हल अंतर्गत २३ सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘इंद्रधनू’चे आयोजन करण्यात आले आहे. याच्या प्रवेशिका दि. २८ ऑगस्ट ते ०३ सप्टें. या कालावधीत दु. १२.०० ते ६.०० यावेळेत मॅरेथॉन भवन, मित्रमंडळ चौक, पुणे-९ येथे उपलब्ध असतील. अर्ज भरून देण्याची तारीख १३ सप्टेंबर पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी २४४२४७४७ / ९३७१२०९७६३ यावरती इच्छुकांनी संपर्क साधावा. असे ‘इंद्रधनु’चे संयोजक रवींद्र दुर्वे यांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments