Type Here to Get Search Results !

पुणे शहरातील आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सभागृह नेते श्री गणेश बिडकर यांनी महापालिका भवनातील सभागृह नेता कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वाची आढावा बैठक घेतली. यावेळी पुणे शहरात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे..

पुणे शहरातील आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सभागृह नेते श्री गणेश बिडकर यांनी महापालिका भवनातील सभागृह नेता कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वाची आढावा बैठक घेतली. 


यावेळी पुणे शहरात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.



यासोबतच शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या तयारीचा आढावा तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी समन्वय वाढविण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, पाणी साचणारे भाग, ड्रेनेज व्यवस्था, झाड पडणे तसेच तातडीच्या प्रतिसाद यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला.


यावेळी महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त श्री. ओम प्रकाश दिवटे, शहर अभियंता श्री. अनिरुद्ध पावसकर, उपायुक्त आपत्ती व्यवस्थापन श्री. माधव जगताप, मुख्य अधीक्षक अभियंता (मलनिस्सारण) श्री. खानोरे, मुख्य अभियंता (पथ विभाग) श्री. राजेश बनकर तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments