मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे...प्रतिनिधी..
कै. पै. धनजी वस्ताद मारुती सोलंकी प्राचीन हनुमान मंदिर,444 भवानी पेठ,हरका नगर,पुणे येथे बालयोगी दिग्विजय नाथ महाराज व गोरक्षक मिलिंद भाऊ एकबोटे,हरिदास महाराज वारकरी संप्रदाय यांच्या प्रमुख उपस्थितीत हनुमान जन्मोत्सव भंडारा उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्या साठी हरका नगर मधील समस्त रहिवासी व आजी माजी नगरसेवक विद्यमान नगरसेवक समाज पंचायत अध्यक्ष तरुण मंडळ, महिला मंडळ लहान थोर यांच्या सानिध्यामध्ये हा उत्सव संपन्न झाला.
या मंदिराची स्थापना सुमारे 300 वर्षांपूर्वी कैलासवासी पैलवान धनजी वस्ताद सोलंकी यांनी केली.
व आता त्यांची पाचवी पिढी हा वारसा जतन करत आहे सेवक पुजारी दिनेशजी सोलंकी यांनी ही माहिती दिली.
या हनुमान जन्मोत्सवामध्ये गेली 35 वर्ष भंडाऱ्याचे आयोजन केले जाते यामध्ये सुमारे पंधराशे ते 2000 लोकांना महाप्रसादाचा लाभ घेता येतो भंडाऱ्यासाठी समस्त हरकानगर मधील सर्व रहिवासी भक्तगण इयत्ता शक्ती सहाय्य करत असतात.



Post a Comment
0 Comments