Type Here to Get Search Results !

डी. वाय. पाटील संघाचे दुहेरी यश मुलांपाठोपाठ मुलींच्या गटातही बाजी, आर्की क्रिकेट स्पर्धा

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (एसएसएमएससीओए) यांच्या वतीने आयोजित विद्याश्री डेव्हलपर्स आर्की क्रिकेट अजिंक्यपद २.० स्पर्धेत मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेजच्या संघानेच मुलांच्या गटाचेही विजेतेपद मिळवले होते. त्यामुळे डी. वाय. पाटील कॉलेजने दुहेरी यशाचा आनंद साजरा केला.


सहकारनगर येथील शिंदे हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर चे चेअरमन विकास अचलेकर, राज्याचे नगररचना विभाग सहाय्यक संचालक महेंद्र परदेशी, विद्याश्री डेव्हलपर्सचे अतित अदमुलवार, डॉ. केतन कुंभार अशोक शिंदे यांसह महाविद्यालयाचे पदाधिकारी उपस्थित होते. 


डी. वाय. पाटील संघाने अंतिम लढतीत श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या संघावर (एसएसएमएस-१) सात गडी राखून विजय मिळवला. एसएसएमएस संघाला निर्धारित ५ षटकांत २ बाद ३३ धावाच फलकावर लावता आल्या. डी. वाय. पाटील संघाने विजयी लक्ष्य अखेरच्या चेंडूवर एक गडीच्या मोबदल्यात पूर्ण केले.  


संक्षिप्त धावफलक – एसएसएमएस – १-५ षटकांत २ बाद ३३ (रिया इंदुलकर १०, अनुष्का गुप्ते ९, प्राजक्ता बोकडे १-४, सई कुलकर्णी १-३) पराभूत वि. डी. वाय. पाटील – ५ षटकांत १ बाद ३४ (तन्वी कोल्हे नाबाद १७, निकिता फडतरे नाबाद ११, अनिष्का १-१२).

Post a Comment

0 Comments