Type Here to Get Search Results !

खराडीच्या धर्तीवर हडपसर परिसरातील विविध आगीच्या घटनांमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना आर्थिक मदत द्या | प्रमोद नाना भानगिरे यांची स्थायी समिती अध्यक्षांकडे मागणी

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे...प्रतिनिधी..

खराडीच्या धर्तीवर हडपसर परिसरातील विविध आगीच्या घटनांमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना आर्थिक मदत द्या | प्रमोद नाना भानगिरे यांची स्थायी समिती अध्यक्षांकडे मागणी

खराडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमध्ये २३ एप्रिल २०२५ रोजी लागलेल्या भीषण आगीत सुमारे ९० झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. या दुर्घटनेत एका रहिवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जळीतग्रस्त ९० कुटुंबांना प्रत्येकी ११,००० रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला असून हा निर्णय निश्चितच आपत्तीग्रस्त नागरिकांप्रती असलेली सामाजिक संवेदनशीलता आणि मानवी मूल्ये अधोरेखित करणारा आहे. संकटाच्या काळात महानगरपालिकेने घेतलेला हा सकारात्मक निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून त्याबद्दल स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांचे अभिनंदन आणि खूप आभार. त्याच धर्तीवर हडपसर परिसरातील विविध आगीच्या घटनांमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना आर्थिक मदत द्या, अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्याकडे केली आहे.

नाना भानगिरे यांनी स्थायी समिती अध्यक्ष यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि,  हडपसर परिसरातही मागील काही काळात विविध ठिकाणी आगीच्या घटना घडून स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या घटनांमध्ये अनेक कुटुंबांची घरे, घरगुती साहित्य, उपजीविकेची साधने तसेच जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याने संबंधित कुटुंबांवर मोठे आर्थिक व मानसिक संकट ओढवले आहे. विशेषतः राममनोहर लोहिया गार्डन परिसरातील झोपडपट्टी भागात लागलेली आग, कृष्णानगर स्मशानभूमी परिसरातील गोदामाला लागलेली आग, मगरपट्टा परिसरातील झोपडी भागात सिलेंडर स्फोटामुळे लागलेली आग तसेच काळेपडळ येथील सोसायटीच्या पार्किंगमध्ये लागलेली आग या घटनांमुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झालेले आहे......

Post a Comment

0 Comments