Type Here to Get Search Results !

कमर्शियल एलपीजी सप्लाय सुरुवातीला पूर्णपणे बंद होता. तो पुर्वव्रत करण्यात आला आहे. विविध राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ताब्यात ठेवलेल्या सिलेंडर्सचे वितरणही सुरू आहे. बिहार, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मणिपूर, राजस्थान, उत्तराखंड इत्यादी राज्यांनी नॉन-डोमेस्टिक एलपीजीसाठी अलोकेशन ऑर्डर्स जारी केले आहेत... अली दारूवाला सर

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 



कमर्शियल एलपीजी सप्लाय सुरुवातीला पूर्णपणे बंद होता. तो पुर्वव्रत करण्यात आला आहे. विविध राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ताब्यात ठेवलेल्या सिलेंडर्सचे वितरणही सुरू आहे. बिहार, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मणिपूर, राजस्थान, उत्तराखंड इत्यादी राज्यांनी नॉन-डोमेस्टिक एलपीजीसाठी अलोकेशन ऑर्डर्स जारी केले आहेत

केरोसीनबाबत आधी सांगितल्याप्रमाणे, तिमाही वाटपाबरोबरच सुमारे 48,000 अतिरिक्त केरोसीन घरगुती वापरासाठी दिले गेले आहे. यासंदर्भात सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना विनंती करण्यात आली होती की त्यांनी जिल्हा स्तरावर एक-दोन ठिकाणे निश्चित करून वितरण व्यवस्था उभी करावी.

या अनुषंगाने बिहार, छत्तीसगड, मणिपूर, केरळ, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक यांनी SKO अलोकेशन ऑर्डर्स जारी केले आहेत

एसेंशियल कमोडिटीज अ‍ॅक्ट आणि एलपीजी कंट्रोल ऑर्डर अंतर्गत साठेबाजी hoarding  आणि काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सप्लाय आणि नियमित मॉनिटरिंगसाठी त्यांचा सहभाग आवश्यक आहे

भारत सरकारने 13 तारखेला सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना विनंती केली की त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि अंमलबजावणी यंत्रणांना समन्वयित आणि अचानक तपासण्या करण्याचे निर्देश द्यावेत.

या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी कंट्रोल रूम स्थापन केल्या आहेत. तसेच राजस्थान, तेलंगणा, गोवा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू इत्यादी राज्यांनी जिल्हास्तरावर मॉनिटरिंग कमिट्या स्थापन केल्या आहेत. ज्या ठिकाणी अजून या कमिट्या स्थापन झालेल्या नाहीत, त्या राज्यांना लवकरात लवकर त्या स्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

एनफोर्समेंट अ‍ॅक्शनबाबत गेल्या काही दिवसांत सुमारे 12,000 छापे टाकण्यात आले आहेत आणि अंदाजे 15,000 सिलेंडर्स जप्त करण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये काल सुमारे 600 सिलेंडर्स जप्त करण्यात आले. उत्तर प्रदेशात 450 छापे टाकण्यात आले आणि 10 जणांना अटक करण्यात आली. जम्मू-काश्मीरमध्ये 564 छापे आणि एफआयआर नोंदवण्यात आले. केरळमध्ये सुमारे 1000 तपासण्या झाल्या आणि सिलेंडर्स जप्त झाले. मध्य प्रदेशात 1200 छापे आणि सुमारे 1800 सिलेंडर्स जप्त करण्यात आले. 

याशिवाय ऑइल मार्केटिंग कंपन्यांच्या तपासणी पथकांनी सुमारे 2500 रिटेल आउटलेट्स आणि एलपीजी वितरकांवर अचानक तपासण्या केल्या आहेत

देशवासीयांना आवाहन करण्यात आले की अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरू नये, ऑनलाइन बुकिंग करावी आणि एलपीजी सिलेंडर घरपोच मिळेल. पॅनिक बुकिंग टाळावी. अलीकडे सुमारे 70 लाख पॅनिक बुकिंग नोंदवण्यात आल्या आहेत. 

जिथे शक्य आहे तिथे पर्यायी इंधनांचा वापर करावा जसे पीएनजी, इंडक्शन किंवा इलेक्ट्रिक कुकटॉप. तसेच एलपीजीचा वापर जपून करावा

Post a Comment

0 Comments