Type Here to Get Search Results !

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन येत्या 21-22 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र भेटीवर येणार

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन येत्या 21-22 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र भेटीवर येणार

By PIB Mumbai


नवी दिल्‍ली, 20 मार्च 2026

 

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 21-22 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राच्या भेटीवर येणार आहेत. उपराष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हा त्यांचा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे. 

आपल्या या भेटीत 21 मार्च 2026 रोजी, उपराष्ट्रपती नागपूर इथल्या महर्षी व्यास सभागृहात भारतीय युवा संसदेच्या 29 व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

त्यानंतर ​त्याच दिवशी ते, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान समारंभाला आणि मुंबईतील लोक भवन इथे आयोजित 64 जैन दीक्षा सोहळ्यालाही उपस्थित राहणार आहेत.

आपल्या या दौऱ्याच्या दुसर्‍या दिवशी ​22 मार्च 2026 रोजी, उपराष्ट्रपती पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन इथल्या निसर्गोपचार आश्रमाच्या स्थापना दिन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

0 Comments