Type Here to Get Search Results !

फक्त नावानेच नाही तर आपल्या कर्तृत्वानेही विशाल असणारा माझा लहान भाऊ म्हणजे विशाल दरेकर.

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे...

फक्त नावानेच नाही तर आपल्या कर्तृत्वानेही विशाल असणारा  लहान भाऊ म्हणजे विशाल दरेकर. 


पक्षीय व महापालिकेतील जबाबदाऱ्या सांभाळत असताना माझ्या मागे प्रभागातलं प्रत्येक काम, नागरिकांचे रोजचे प्रश्न, कुठलीही अडचण असो विशाल कायम शांतपणे, न थकता आणि प्रामाणिकपणे सगळं सांभाळतो. दररोज लोकांशी थेट संवाद ठेवून त्यांची दुःखं, समस्या आपली मानून सोडवण्याचा प्रयत्न करणारा हा माणूस आहे.




प्रतिकूल परिस्थिती आली तरी मागे न हटता ठामपणे उभा राहणं ही त्याची खरी ताकद आहे. महापालिका निवडणुकीत मिळालेल्या माझ्या विजयामागे अनेक हात होते, त्यातला सर्वात मजबूत बॅकबोन म्हणजे विशाल.


प्रसिद्धी नको, फोटो नको फक्त काम आणि जबाबदारी एवढंच त्याला महत्त्वाचं वाटतं, याचा अभिमान वाटतो.


विशाल, वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! असाच खंबीर राहा, लोकांसाठी काम करत राहा.

Post a Comment

0 Comments