Type Here to Get Search Results !

लोहगाव येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन उत्साहात साजरा*



मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 



 -पुणे दिनांक २६ - 

*लोहगाव येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा १० व्या वर्धापन दिनानिमित्ताने शिळा मंदिर प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ लोहगाव यांच्या वतीने हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला गुरुबाबा औसेकर महाराज याचे आशीर्वादानेव गुरुवर्य सद्गुरूंनाथ माऊली महाराज वाळुंजकर यांच्या शुभहस्ते वीणा व गाथा पूजन करून  लोहगावचे माजी सरपंच पांडुरंग खेसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरवात करण्यात आली.


आठ दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात  गाथा पारायन व्यासपीठ चालक म्हणून हभप गोरक्षनाथ वर्पे महाराज हे होते. काकड आरती,गाथा पारायन ,महिला भजनी मंडळाचे भजन ,हरिपाठ ,कीर्तन , हरीजागर व दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तनकार वारकरी भुषण हभप गणेश महाराज खेडकर ,हभप मंगेश महाराज कदम ,हभप ज्ञानेश्वर महाराज वाबळे , हभप केशव महाराज पवार , हभप पांडुरंग शास्त्री शितोळे , औसा संस्थांचे पाचवे पिठाधिपती समर्थ सद्गुरु ह भ प श्री गुरुबाबा महाराज औसेकर, ह भ प आचार्य हरिदास महाराज पालवे शास्त्री, ह भ प गुरुवर्य पंडित महाराज क्षीरसागर यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली 



यावेळी अरुण कोठावळे उद्धव महाराज शिंदे भाऊसाहेब धावडे सर आदिनाथ जी सटले गुरुजी वैशाली प्रकाश खांदवे, रामेश्वर सुपेकर राधाकृष्ण गरड गुरुजी यांनी हरिजागरामध्ये उत्साह वाढवला त्यांना शंकर महाराज इंगोले रामेश्वर महाराज सुपेकर, यशवंत महाराज खामकर ,तुकाराम  पांचाळ, बळवंत पांचाळ ,हनुमंत साठे व विणेकरी राणू वाळुंज यांनी सहकार्य केले.


शिळा मंदिर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हभप अशोकराव खांदवे व सर्व सभासद यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  तसेच समस्त लोहगाव ग्रामस्थ ,भजनी मंडळे व महिला भजनी मंडळ व कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments