मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे...
प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावरच्या हल्ल्याविरोधात काँग्रेस आक्रमक
काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आदरणीय हनुमंतजी पवार यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा लोकशाही मूल्यांवरचा आघात आहे. मतभेद असू शकतात, परंतु हिंसा हा कोणत्याही प्रश्नाचा मार्ग नाही. या घटनेचा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन हल्ल्यामागील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी, समाजकंटकांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि कायद्याचा धाक निर्माण करावा, अशी ठाम मागणी केली. तसेच हनुमंतजी पवार यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशीही मागणी युवक काँग्रेस व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री व काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आदरणीय रमेशदादा बागवे, माजी आमदार माननीय मोहन जोशी, पुणे महानगरपालिकेचे गटनेते चंदूशेठ कदम, माजी महापौर व काँग्रेस पक्षाचे नेते माननीय प्रशांत जगताप, पुणे प्रदेश काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष माननीय अभय छाजेड तसेच काँग्रेसचे आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाने “कायद्याच्या पुढे कोणीही नाही” असे स्पष्ट करत सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
लोकशाहीत विचारांची लढाई ही विचारांनीच व्हावी, हिंसाचाराला कोणतीही जागा नाही. काँग्रेस पक्ष अन्यायाविरोधात ठाम उभा राहील आणि कायद्याच्या चौकटीत न्याय मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहील.




Post a Comment
0 Comments