Type Here to Get Search Results !

फुलेनगर-नागपूरचाळ प्रभाग क्रमांक २मध्ये भाजपची प्रचार रॅली , हळदी कुंकू व कोपरा सभा

  


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे ..प्रतिनिधी..

            पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्र.२फुलेनगर नागपूरचाळ मध्ये भाजपा आर पी आय आठवले गटाचे उमेदवार ऍड.रेणुका चलवादी ,सुभाष वाघमोडे,राहुल जाधव व भाजपा पुरस्कृत अदिती बाबर यांनी आज दत्त मंदिर इंदिरानगर, फुलेनगर , शांतीनगर या परिसरात प्रचार रॅली काढण्यात आली 



.ठिकठिकाणी सर्व उमेदवारांचे औक्षण करण्यात आले. तसेच स्वातंत्र्यवीर तरुण मंडळ , गणपती चौक ,नागपुचाळ या भागात रेणूकाताई चलवादी यांनी महिलांसाठी हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .



अनुराधा चव्हाण ,वैशाली ठाकूर ,उषा पवार यांच्या बरोबर मोठया प्रमाणात महिला उपस्थित होत्या.  महिलांनी आपल्या समस्या रेणुकाताई यांच्यासमोर मांडन्यात आल्या.सर्व उमेदवार उच्चशिक्षित असून त्या सर्वांना आपण बहुमताने विजयी करावे असे आवाहन करून आपले महत्त्वाचे प्रश्न त्यामध्ये रोजगार , आरोग्याच्या  सुविधा, नियमित व वेळेवर स्वच्छ पाणी ,  मनपाच्या शाळेतील मुलांसाठी सीबीएसई बोर्डाच्या धर्तीवर शिक्षण आदी  सर्व समस्या सोडविण्यासाठी मी वचनबद्ध असल्याचे रेणुका चलवादी यांनी सांगितले . 



शांतीनगर येथील बुद्ध विहाराजवळ व पंचशीलनगर येथे कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये माजी नगरसेवक डॉ. हुलगेश चलवादी ,माजी नगरसेवक भगवानराव जाधव ,हर्षद जाधव , डॉ. योगेश कदम , आर पी आय चे महाराष्ट्र सचीव बाळासाहेब जानराव ,विनोद टोपे , सागर कांबळे , चंद्रकांत नाईक उपस्थित होते.सर्व कार्यक्रमास मतदारांनी मोठया संख्येने उपस्थिती दाखवली.

Post a Comment

0 Comments