मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे (दि.८)
प्रभाग २५ शनिवारपेठ महात्मा फुले मंडईचे कॉंग्रेसपक्षाचे अधिकृत उमेदवार निरंजन बाळासाहेब दाभेकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री ना.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
मोदी गणपती चौक येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी मा.आ. मोहनदादा जोशी, मा.आ.अनंतराव गाडगीळ, बाळासाहेब दाभेकर, उमेदवार निरंजन बाळासाहेब दाभेकर, अनिल येनपुरे, तेजस्विनी दाभेकर, उमेश मिस्त्री, राजेंद्र पंडित गौरव बोराडे, सुरेश कांबळे. आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलतांना पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यकर्त्यांवर टिका करत नवे उद्योग आणले नाहीत अशी टिका केली. तसेच निरंजन दाभेकर यांनी कोविड काळात केलेल्या सेवा कार्याचे आणि सामाजिक व सांस्कृतिक कार्याचे कौतुक केले.

Post a Comment
0 Comments