मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
दुबई...
गेले 2 दिवस ढगाळ हवामान असलेल्या दुबई काल मुसळधार पावसाने झोडपले... येथे ड्रेनेज व्यवस्था नसल्याने सर्वत्र पाणीच पाणी आणि मोठी वाहतूक कोंडी पहायला मिळाली....
काल ( 18 डिसेंबर ) सायंकाळी विमानतळ गाठले.... आमची रात्रौ 11:35 ची flight.... एकापाठोपाठ विमानोड्डाणं रद्द च्या बातम्या धडकत होत्या आणि विमानतळाचे टर्मिनल 2 एस टी स्टँड पेक्षाही जास्त गर्दीने तुडुंब भरले होते.... दुबई हे शांत विमानतळ त्यामुळे इथे उदघोषणा नाहीत, समोर उत्तर द्यायला कोणी अधिकारी ही नाही, सगळा chaos होता....कोणालाच काही कळत नव्हते....
थोड्या वेळाने गोवा, अहमदाबाद, कराची, अंकारा अशी काही विमाने हवेत झेपावली....त्यामुळे आम्हा मुंबई च्या प्रवाश्यांची आशा पल्लवीत झाली... प्रवाश्यांचा पारा चढत होता... जागोजागी वादविवाद आणि आरडाओरडा सुरु होता.....पहाटे 3/3:30 ला Fly Dubai च्या काही अधिकाऱ्यांनी खेकसत चं Mac D किंवा KFC मधून सर्वांना meal देत असल्याची घोषणा केली.... पोटात कावळे ओरडत असल्यामुळे सर्वांनीच पेटपूजा केली आणि तेवढ्यात अधिकाऱ्यांनी मुंबई च्या प्रवाश्यांनी गेट क्रं 11 जवळ लाईनीत उभे रहावे असे सांगितलं.... सर्वांचेच चेहरे फुलले.... मात्र दुर्दैव काही पाठ सोडेना... विमान रद्द झाले असून तुम्हाला आम्ही उद्याचे (19 डिसेंबर चे ) रात्री 11:35 च्या flight चे बोर्डिंग पास देत असून तुम्हाला तोपर्यंत हॉटेल मध्ये ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले....
माझे लोकांना समजावणे, अधिकाऱ्यांशी चर्चा हे समाजकार्य माझ्या अंगाशी आले आणि काही वेळातच 19 च्या रात्रीची flight हॉउसफ़ुल्ल झाली असून माझ्यासह अनेक प्रवाश्यांना 20 तारखेला रात्री 11:35 ला accomodte करू असे सांगण्यात आले.... मग immigration वा इतर सोपस्कार पूर्ण करून एका बऱ्यापैकी हॉटेल मध्ये आम्ही आलोय....
दुष्टचक्र इथेच संपत नाहीये.... आम्हाला बॅग मिळालेल्या नाहीत त्या check in baggage मध्ये आहेत... उद्या रात्री पर्यंत काय कपडे घालावे हा प्रश्न तर दुय्यम आहे पण अनेक ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं सर्वांचीच आबाळ होते आहे.... रोलबॉल च्या पुरुष आणि महिला गटात केनिया ला पराभूत करून हिंदुस्थान विजयी झाल्याचा आनंद तर विरलाच आहे, पण दोन दिवस करायचे काय हा ही प्रश्न आहे.... अनेकांकडे पुरेसे पैसेही नाहीत.... आता मंत्रालय, fly dubai कंपनी व सर्वत्र फोनाफोनी करत आहे...अनेक विमानांचे उड्डाणं रद्द किंवा नियोजित वेळेपेक्षा खूप उशिराने होत आहे.....
मित्रवर्य नितीन इसरानी यांनी त्वरित दोन दिवस पुरेल येवढा खाऊ धाडलाय आणि कपडे विकत घेऊन पाठवतो म्हणतोय.... तर सौरभ अथणीकर ह्या पुण्यातील स्नेह्याने ( सध्या दुबईत असलेल्या ) पाणी ओसरले तर संध्याकाळी येतो दादा " चूल मटण " ला जेवायला जाऊ सांगितलंय... तिकडे माझा जीवलग मित्र राजेंद्र गादिया ची लेक नुपूर चोरडिया म्हणतीये की काका तुम्ही अबुधाबीला माझ्या घरी या आणि flight मिळेपर्यंत इथेच रहा...... सध्या तरी वाईट अडकलोय..... कुठेचं जाता येणे शक्य नाही....निसर्गाच्या लहरीपणाचे फटके सगळे जगच अनुभवत आहे....ग्लोबल वार्मिंग म्हणजे काय रे भाऊ म्हणणाऱ्यांना निसर्गाने दणका दिलाय येवढ मात्र खरं.....बघुयात काय होते ते....

Post a Comment
0 Comments