प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे :
आई कलाग्राम फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘मला व्यक्त व्हायचंय’ या विशेष उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद लाभला. महिलांना स्वतःच्या भावना, अनुभव व विचार निर्भीडपणे मांडण्यासाठी सुरक्षित व प्रेरणादायी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विविध वयोगटातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत हा उपक्रम यशस्वी केला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून
सौ. वासंती देवळे (कौन्सिलर व मोटिवेशनल स्पीकर),
सौ. स्वाती काशीकर (कौन्सिलर व समाजसेविका)
आणि सौ. सुनीती ताई धायगुडे यांचे प्रभावी मार्गदर्शन लाभले. त्यांच्या संवादातून महिलांना मानसिक बळ, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन मिळाल्याचे सहभागी महिलांनी आवर्जून नमूद केले.
कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून
सौ. पुष्पाताई कुदळे, सौ. मोडक तसेच सौ. शिल्पा तिकोणे उपस्थित होत्या. त्यांनी महिलांच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने विचार मांडत या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
आई कलाग्राम फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सौ. सुनीता निंबाळकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून महिलांचे सक्षमीकरण, स्व-अभिव्यक्तीला चालना देणे तसेच पीडित महिलांसाठी खंबीर आधार निर्माण करण्याच्या उद्देशाने असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिलांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
आई कलाग्राम फाउंडेशन आयोजित ‘मला व्यक्त व्हायचंय’ उपक्रमात मार्गदर्शक, मान्यवर आणि सहभागी महिला.

Post a Comment
0 Comments