मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे ..
मातंग एकता आंदोलन तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन
पुणे स्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन..!!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे स्टेशन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब सांस्कृतिक समिती आणि संविधानवादी नागरिकांच्या वतीने स्मारक कसे असावे याबाबतचा अभिप्राय सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.
या कार्यक्रमाला राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे, नगरसेवक अविनाश बागवे, मातंग एकता आंदोलनाचे राज्य समन्वयक विठ्ठलजी थोरात, सुनीलजी बावकर, पदाधिकारी मारुती कसबे, हुसैनभाई शेख, युवक आघाडीचे आदित्यजी गायकवाड, राहुलजी चिंदम तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, संविधानाच्या मूल्यांची जपणूक आणि प्रस्तावित स्मारक उभारणीची दिशा याबाबत सर्वांनी बांधिलकी व्यक्त केली.



Post a Comment
0 Comments