मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
विणा म्युझिक अकॅडमी तर्फे पत्रकार भवन पुणे येथे सुमधुर गीतांचा कार्यक्रम संपन्न,
विणा म्युझिक अकॅडमी तर्फे पत्रकार भवन पुणे येथे विणा के गीत हा हिंदी मराठी गीतांचा सुमधुर कार्यक्रम संपन्न झाला, प्रसिद्ध पार्श्वगायिका विणा मॅडम यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता, कार्यक्रमांमध्ये विणा मॅडम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गायक गफार मोमीन यांचा सह सहाय्यक गायन सुनील नवरे, भास्कर कोल्हापूर, उदय गायकवाड, बसवराज जीवन, यांनी हिंदी, मराठी, गायनाने तसेच कोळी गीताने रसिकांचे मने जिंकली,
या गीतांच्या कार्यक्रमास रसिकांना मोफत प्रवेश होता, कविता गायकवाड, मीरा पाटील, भारती हडपड यांच्या हस्ते संगीत क्षेत्राशी निगडित असलेल्या मान्यवरांना पुरस्कार वितरण करण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम शेठ अगरवाल यांनी केले तर आभार विणा मॅडम यांनी मानले, या कार्यक्रमाच्या समारोपच्या वेळी प्रसिद्ध हिंदी चित्रपट ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती,


Post a Comment
0 Comments