मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे ..प्रतिनिधी...
संसार शिवण केंद्रामुळे महिला सक्षमीकरणाला चालना
इंदिराताई बागवे यांची पाहणी
क्रांतीवीर लहुजी साळवे वस्ताद एकता प्रतिष्ठान, पुणे महानगर पालिका महिला बचतगट आणि मुक्ता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ‘संसार शिवण केंद्रा’चे उद्घाटन काही दिवसांपूर्वी उत्साहात पार पडले. या उपक्रमाची मुक्ता फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. इंदिराताई अविनाश बागवे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
या उपक्रमासाठी मुक्ता फाउंडेशन च्या माध्यमातून २० सिलाई मशीन देऊन, तेथे प्रशिक्षक सुद्धा उपलब्ध करून हे वर्ग सुरू करण्यात आले.
यासाठी मोलाचे सहकार्य, स्थानिक नगरसेवक श्री.अविनाश रमेशदादा बागवे यांनी केले, असे मत येथील व्यवस्थापक, सौ. फर्जाना खान मॅडम यांनी व्यक्त केले.
काशीवाडी परिसरातील महिलांसाठी स्वयंरोजगाराचे नवे दालन उघडणारे हे शिवण प्रशिक्षण केंद्र मोठ्या प्रमाणावर महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गजबजले आहे. गृहिणी, तरुणी तसेच विद्यार्थीनी येथे येऊन शिवणकला शिकत आहेत. प्रशिक्षणानंतर याच परिसरात लघुउद्योग सुरु करण्यासाठी त्यांना आवश्यक मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले जात आहे.
या उपक्रमामुळे महिला आत्मनिर्भर होऊन घरगुती उत्पन्नात मोलाची भर टाकू शकतात, ज्यातून महिला सक्षमीकरणाला प्रत्यक्ष चालना मिळत आहे, असे मत येथील लाभार्थी बोलत होते.
पाहणीदरम्यान इंदिराताई बागवे यांनी सांगितले की,
“महिलांसाठी सुरक्षित, कौशल्यविकासावर आधारित रोजगार उपलब्ध करणे हे आमचे प्रमुख ध्येय असून, संसार शिवण केंद्र हा त्याच दिशेने उचललेला महत्वाचा टप्पा आहे.”
यावेळी संस्थेकडून इतर विविध कौशल्य आधारित व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याचाही संकल्प व्यक्त करण्यात आला असून, भविष्यात या भागातील महिलांसाठी आणखी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.


Post a Comment
0 Comments