Type Here to Get Search Results !

आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मधील मतदारयादीत इतर परिसरातील मतदारांची नावे समाविष्ट झाल्याचे समोर आले. या गंभीर अनियमिततेबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे हरकत नोंदवण्यासाठी नागरिक प्रतिनिधींचे शिष्टमंडळ भेटीस गेले

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे प्रतिनिधी...


आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मधील मतदारयादीत इतर परिसरातील मतदारांची नावे समाविष्ट झाल्याचे समोर आले.

या गंभीर अनियमिततेबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे हरकत नोंदवण्यासाठी नागरिक प्रतिनिधींचे शिष्टमंडळ भेटीस गेले.

यावेळी शिष्टमंडळातील सदस्य श्री. सदानंद शेट्टी, श्री. अमर कोरे, श्री. विनोद काळोखे, श्री. विरेंद्र किराड आणि श्री. अलीम शेख उपस्थित होते.

मतदारसंघातील पारदर्शकता, अचूकता आणि प्रामाणिक निवडणूक प्रक्रियेची हमी मिळावी, हा या भेटीचा मुख्य उद्देश होता.

शिष्टमंडळाने संबंधित सर्व कागदपत्रांसह निवडणूक अधिकाऱ्यांकडे औपचारिक हरकत नोंदवून तातडीने दुरुस्तीची मागणी केली.



Post a Comment

0 Comments