Type Here to Get Search Results !

21 वा सेवा • कर्तव्य • त्याग सप्ताह सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमाचे पुण्यात उद्घाटन

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की,

“समाजात बुद्धिभेद निर्माण करणे हे भाजपचे काम, आणि प्रत्येक गोष्टीवर ताबा मिळवणे हे संघाचे काम आहे. आपल्या देशाचा स्वाभिमान जात, धर्म, भाषा यात नाही तर आपल्या इतिहासात आणि कर्तृत्वात आहे.”


काँग्रेसचे माजी आमदार मोहनदादा जोशी यांच्या संकल्पनेतून, काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आयोजित केला जाणारा ‘सेवा • कर्तव्य • त्याग’ सप्ताह यावर्षी २ ते ९ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

या उपक्रमाचे उद्घाटन एस.एम. जोशी सभागृह, नवी पेठ येथे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या हस्ते झाले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उल्हास पवार, तर प्रमुख उपस्थितीत

मोहनदादा जोशी, रमेश बागवे, अरविंद शिंदे, संजय बालगुडे, श्रीरंग चव्हाण, कैलास कदम, अविनाश साळवे, सुनील मलके, वीरेंद्र किराड, चंद्रशेखर कपोते, अमीर शेख, हनुमंत पवार, अविनाश बागवे, स्वाती शिंदे, चेतन अग्रवाल, सौरभ अमराळे, लता राजगुरू आदी मान्यवर होते.


सपकाळ म्हणाले की, गांधींनी “भारत” या राष्ट्रभावनेला जन्म दिला. आज राजकारणात सेवेसाठी नव्हे तर मेव्याच्या राजकारणासाठी स्पर्धा सुरू आहे. सोनिया गांधी यांनी राजकीय संकटांवर मात करून राष्ट्रहितासाठी काम केले. राहुल गांधींना सत्तेची इच्छा नसून काँग्रेस नेतृत्व आणि विचार पुढे नेण्याची धडपड आहे.

महाराष्ट्रातील सामाजिक समता बिघडवली जात असल्याने मी मुख्यमंत्री यांची तुलना औरंगजेबाशी केली — आणि आजही त्या मतावर ठाम आहे, असे त्यांनी सांगितले.


उल्हास पवार म्हणाले की, पुण्यात धर्मांधता आणि जातीयवादाचे विष भाजपने पेरले आहे. इतिहासाचे विकृतीकरण थांबले पाहिजे.


मोहनदादा जोशी म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी राज्यभर घेतलेल्या ६५ पेक्षा जास्त सभांमुळे भीतीचा पडदा फाडला. काँग्रेस कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देण्याचे काम त्यांनी केले. काँग्रेसच्या काळातील पुण्यातील मोठ्या विकासकामांना अधोरेखित करण्यासाठी “होय, हे काँग्रेसनेच केले!” ही मोहीम सुरू करण्यात आली असून पाच हजार दुचाकींवर ‘पंजा’ चिन्ह लावण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे.


Post a Comment

0 Comments