प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे...
पुणे महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी थकबाकी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी एक खिडकी कक्ष सावरकर भवन पहिला मजला येथे स्थापन केला असून या ठिकाणी सर्व विभागाच्या नाहरकत एकत्र प्राप्त होणार आहेत.
यासाठी महानगर पालिकेने संगणक प्रणाली विकसित केली असून nocelection.pmc.gov.in या लिंक वरून उमेदवारांना नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी नोंदणी करता येईल. सर्व इच्छुक उमेदवारांनी नाहरकत प्रमाणपत्रासाठी online अर्ज दाखल करावे.
Online अर्ज दाखल केल्यास कमीत कमी वेळात उमेदवारांना नाहरकत प्रमाणपत्र डाउनलोड करून घेता येईल. त्यामुळे सर्वांनी आपले अर्ज वरील लिंक वर ऑनलाइन स्वरूपातच दाखल करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments