Type Here to Get Search Results !

गेरा डेव्हलपमेंट्सकडून भारतातील पहिली “वेलनेससेंट्रिक होम्स™” संकल्पना — आरोग्यदायी आणि संतुलित जीवनशैलीकडे एक नवा दृष्टिकोन हृतिक रोशनची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती – समतोल आणि सजग जीवनशैलीचे प्रतीक

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे, ४ नोव्हेंबर २०२५: गेरा डेव्हलपमेंट्स प्रा. लि. (GDPL) — पुणे, गोवा, बेंगळुरू आणि कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे नावाजलेले आणि पुरस्कारप्राप्त प्रकल्प साकार करणारे रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रगण्य नाव — यांनी पुन्हा एकदा शहरी जीवनशैलीची नवी व्याख्या सादर केली आहे. “गेरा वेलनेससेंट्रिक होम्स™” ही भारतातील पहिलीच अशी संकल्पना आहे, जी सर्वांगीण आरोग्याला दैनंदिन जीवनाचा मोजता येणारा भाग बनवते.


“चाइल्डसेंट्रिक® होम्स”द्वारे आधुनिक कुटुंबांसाठी जीवनाचा नवा दृष्टीकोन निर्माण केल्यानंतर, गेरा डेव्हलपमेंट्स आता वेलनेस थेट घरात घेऊन आले आहे. वेलनेससेंट्रिक होम्स ही अशी राहणीमान संकल्पना आहे जिथे मन, शरीर आणि आत्म्याचा समतोल विज्ञानाधारित डिझाइन, नियोजित वेलनेस कार्यक्रम आणि समुदायातील सहभाग यांच्या माध्यमातून साधला जातो.


विचारपूर्वक आखलेले लेआउट्स, शुद्ध हवा, नैसर्गिक प्रकाश आणि खास वेलनेस झोन हे सर्व एकत्र येऊन शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन निर्माण करतात. या प्रकल्पात वेलनेस हे फक्त “अॅमेनिटीज”पुरते मर्यादित नसून, डिझाइन, सेवा आणि तज्ज्ञ मार्गदर्शन यांच्या माध्यमातून ठोस आरोग्यदायी परिणाम देण्यावर भर आहे — जसे की चांगली झोप, अधिक नैसर्गिक प्रकाश, आणि सजग हालचाल. रहिवाशांना येथे योगा, पिलाटेस, एक्वा एरोबिक्स, पोषण सल्ले, वैयक्तिक फिटनेस कोचिंग आणि समुदाय-आधारित वेलनेस उपक्रमांचा अनुभव मिळणार आहे.


गेरा डेव्हलपमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक रोहित गेरा म्हणाले: “चाइल्डसेंट्रिक® ते वेलनेससेंट्रिक होम्स™ या प्रवासात आम्ही घरांना केवळ निवासस्थान न ठेवता, जीवन समृद्ध करणाऱ्या इकोसिस्टममध्ये परिवर्तित करत आहोत. आजच्या धावपळीच्या आयुष्यात काम घरात आलं आहे, स्वतःसाठी वेळ उरलेला नाही. ‘वेलनेस’ची इच्छा असते, पण ती टिकून राहत नाही. आम्ही या ‘वेलनेस इनर्शिया’वर उपाय शोधला — असा परिसर तयार करून, जिथे आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब सहज आणि नैसर्गिक वाटतो.”


गेरा वेलनेससेंट्रिक होम्स™ हे डिझाइन, विज्ञान आणि जीवनशैली व्यवस्थापनाचं एकत्रित उदाहरण आहे. याचा आधार आहे आमचं विशेष ‘३-स्तरीय सवय इन्फ्रास्ट्रक्चर’ (3-tier Habit Infrastructure) —


Nudge: आरोग्यदायी सवयींना चालना देणारे डिझाइन


Support: सतत तज्ज्ञ मार्गदर्शन आणि समुदाय कार्यक्रम


Sustain: लवचिक, वैयक्तिक योजना ज्या आयुष्यभर आरोग्य टिकवतात



या दृष्टीला अधिक बळ देत, गेरा डेव्हलपमेंट्सने हृतिक रोशन यांची वेलनेससेंट्रिक होम्स™ साठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषणा केली आहे. शिस्त, संतुलन आणि सर्वांगीण फिटनेससाठी ओळखला जाणारा हृतिक या संकल्पनेच्या तत्त्वज्ञानाशी पूर्णपणे सुसंगत आहे.


हृतिक रोशन म्हणाले: “आपल्या सर्वांचं ध्येय म्हणजे स्वतःचं आणि आपल्या प्रियजनांचं जीवन अधिक गुणवत्तापूर्ण बनवणं. गेराने वेलनेसला डिझाइनच्या केंद्रस्थानी ठेवलं आहे, आणि त्यामुळे वेलनेससेंट्रिक होम्स™ ही भविष्यकालीन घरांची उत्कृष्ट उदाहरणं आहेत. ही अशी ठिकाणं आहेत जी दररोज समतोल, सजगता आणि उद्देशपूर्ण जीवनाची प्रेरणा देतात. मला गेराच्या या दृष्टिकोनाचा भाग असल्याचा अभिमान आहे.”


रोहित गेरा पुढे म्हणाले: “हृतिकचा सहभाग हा केवळ सेलिब्रिटी एंडोर्समेंट नाही. त्यांची शिस्त, फिटनेसबद्दलची बांधिलकी आणि समतोल जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आमच्या संकल्पनेशी जुळणारी आहे. तो वेलनेस ही कृती नसून एक जीवनशैली आहे, हे जगतो — आणि हेच या भागीदारीचं सार आहे.”


गेरा वेलनेससेंट्रिक होम्स™द्वारे, कंपनीने नवकल्पना आणि ग्राहककेंद्रित विचारसरणीचा विस्तार केला आहे, ज्यात घरांना केवळ राहण्याचं ठिकाण न ठेवता, आरोग्यदायी, आनंदी आणि जोडलेलं जीवन जगण्यासाठी एक सजीव परिसंस्था म्हणून साकारण्यात आलं आहे.



---


गेरा डेव्हलपमेंट्स प्रा. लि. बद्दल:


गेल्या ५० वर्षांपासून गेरा डेव्हलपमेंट्स हे पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रगण्य नाव आहे. पुणे, गोवा आणि बेंगळुरू येथे त्यांनी उच्च दर्जाचे निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प साकारले असून, कॅलिफोर्निया (अमेरिका) मध्येही त्यांनी उपस्थिती निर्माण केली आहे.


गेराचं “Let’s Outdo” हे तत्त्वज्ञान — नवकल्पना, पारदर्शकता आणि उत्कृष्ट ग्राहक अनुभव — यांवर आधारित आहे. भारतात ५ वर्षांची वॉरंटी देणारा पहिला डेव्हलपर म्हणून गेराने २००४ मध्ये इतिहास घडवला, आणि ७ वर्षांची वॉरंटी देणारी ही देशातील एकमेव कंपनी आहे.


“चाइल्डसेंट्रिक® होम्स”, “इंटेलिप्लेक्सेस™”, “स्कायव्हिलाज™” आणि “इम्पेरियम सीरिज” यांसारख्या संकल्पनांनी त्यांनी उद्योगात नवे मापदंड निर्माण केले आहेत. “गेरा होम इक्विटी पॉवर” आणि “GeraWorld®” मोबाईल अॅपसारख्या उपक्रमांनी ग्राहक अनुभव अधिक सुलभ आणि पारदर्शक केला आहे. “क्लब आउटडू” या टेक-आधारित लॉयल्टी प्रोग्रामद्वारे ग्राहकांना विशेष फायदे आणि समुदाय सहभागाच्या संधी दिल्या आहेत.


गेरा डेव्हलपमेंट्सने सात वर्षे सलग “भारतातील सर्वोत्तम मध्यम आकाराच्या कार्यस्थळांमध्ये (Top 50 Great Mid-Size Workplaces™)” स्थान मिळवलं असून, २०२४ मध्ये “India’s Best Workplaces™ in Real Estate Industry” आणि “Best in Building a Culture of Innovation for All” हे सन्मानही मिळवले आहेत.


गेरा डेव्हलपमेंट्सचे ध्येय म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रातील गुणवत्ता आणि सेवांचे नवीन मापदंड प्रस्थापित करणे आणि ग्राहकांसाठी सातत्याने नवे मूल्य निर्माण करणे.

Post a Comment

0 Comments