मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
सोनई सभेतील आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात पुणे जिल्हा मातंग समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...
📍पुणे
सोनई येथे आयोजित सभेमध्ये मातंग समाजाबद्दल जातिवाचक, आक्षेपार्ह व अपमानास्पद शब्दांचा वापर करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन देण्यात आले.
या घटनेबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला असून, संबंधितांवर महाराष्ट्र जन सुरक्षा कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी समाजाच्या प्रतिनिधींनी केली.
या निवेदनावेळी मातंग समाजाच्या विविध संघटनांचे मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये मा. रमेशदादा बागवे (संस्थापक अध्यक्ष – मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य), मा. विष्णुभाऊ कसबे (अध्यक्ष – लहुजी शक्ती सेना), मा. शंकरभाऊ तडाखे
मा. अनिल हातागळे (अध्यक्ष – लहुजी समता परिषद), मा. अविनाशजी बागवे (कार्याध्यक्ष – मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य),मा. निलेश वाघमारे
मा. विठ्ठलजी थोरात (समन्वयक – मातंग एकता आंदोलन),
मा. दिपकभाऊ कसबे (सचिव – पुणे जिल्हा मातंग समाज), मा. प्रकाश वैराळ
सौ. लोपाताई भगत,तसेच विविध मातंग संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजाच्या सन्मानाचा प्रश्न असल्याने, वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध त्वरीत आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.
या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी "जय लहुजी! जय समता! जय संविधान!" असा नारा देत समाजाच्या ऐक्याचा संदेश दिला.


Post a Comment
0 Comments