Type Here to Get Search Results !

भूमिअभिलेख विभागातील भ्रष्टाचाराविरोधात बसप आक्रमक प्रदेश महासचिव डॉ.हुलगेश चलवादी यांचा आंदोलनाचा पवित्रा प्रशासनाला दिली महिन्याभराच्या मुदत



मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


दिनांक ५ सप्टेंबर २०२५, पुणे:- प्रतिनिधी ...


विद्येचे माहेरघर असलेले पुणे शहरातील नागरिक भूमिअभिलेख विभागातील भ्रष्टाचारामुळे त्रस्त आहेत.जमिनीची मोजणी,प्रापर्टी कार्ड मिळवण्यासाठी नागरिकांना कार्यालाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता बहुजन समाज पार्टीने आंदोलनाच्या पवित्र्या घेतला आहे.नागरिकांच्या समस्या महिन्याभरात मार्गी लावा, अन्यथा घेराव घालून बसप स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी, माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांनी दिला आहे. भूमिअभिलेख कार्यालयासंबंधी तक्रारी,समस्या असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले आहे. विभागातील भ्रष्टाचार जोपर्यंत दूर केला जात नाही तोपर्यंत नागरिकांचे हित साध्य होणार नाही. प्रत्येक कामांसाठी दलालांमार्फत जर अधिकाऱ्यांना चिरीमिरी द्यावी लागत असेल; तर जनसेवेचे ढोंग प्रशासनाने करू नये, अशा तीव्र शब्दात डॉ.चलवादी यांनी त्यांचे मत व्यक्त केले. 


भूमिअभिलेख विभागातील भ्रष्टाचार,हलगर्जीपणा आणि दलालशाहीमुळे नागरिक त्रस्त आहेत. कार्यालयातील सर्वेक्षकांकडून नागरिकांना उघडपणे त्रास दिला जातो. जमिनीसंबंधी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 'लक्ष्मीप्रसाद' द्यावा लागत असल्याच्या अनेक तक्रारी मिळत आहेत. योग्य सर्वेक्षक नसल्यामुळे जमिनीचे मोजमाप व नकाशे चुकीचे होतात. नगररचना आराखडा यांच्याशी जमिनीच्या सीमारेषा जुळत नाहीत.फसवणुकीचे प्रमाण देखील वाढले आहेत.


बनावट दाखले तयार करून दुसऱ्यांच्या नावावर सीमारेषा दाखवली जाते.एकाच जमिनीचे पुन्हा पुन्हा 'डिमार्केशन' करून पिळवणूक केली जाते. एजंट आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे सर्व प्रकार सुरू असल्याचा आरोप डॉ.चलवादी यांनी केला.प्रापर्टी कार्ड मध्ये अनेक चुका केल्या जातात. या चुका दुरूस्ती करण्यासाठी नागरिकांना पुन्हा त्रास सहन करावा लागतो.नाव, क्षेत्रफळ, वारसांच्या नावांमध्ये सातत्याने चुका केल्या जातात. विशेष म्हणजे 'म्युटेशन एंट्री'साठी वर्षानुवर्षे थांबावे लागते, असा आरोप डॉ.चलवादी यांनी केला. 


सर्वसामान्य माणूस आपल्या जमिनीच्या सीमारेषा दुरुस्तीसाठी प्रयत्न करतो तेव्हा त्याला प्रचंड खर्च येतो. न्याय मिळत नाही, उलट दलाल, भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमताने त्याची आणखी फसवणूक केली जाते.या भ्रष्टाचारामुळे हजारो लोकांची घरे बेकायदेशीर ठरवली जात आहेत, सामान्य नागरिकांना रस्त्यावर आणले जात आहे. सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, अन्यथा नागरिकांच्या रोषाचा भडका उडेल हे निश्चित, असा इशारा डॉ.चलवादी यांनी दिला आहे.


----बॉक्स--- 

नागरिकांना अनाधिकृत घर बांधण्यासाठी बाध्य केले जातें!

पुणे, पिंपरी—चिंचवड मनपा तसेच पीएमआरडीए कार्यालयातून नागरिकांना नकाश मंजूर करण्याची इच्छा असताना देखील भूमिअभिलेख विभागातील भोंगळ कारभारामुळे पुणेकर त्रस्त आहेत. प्रापर्टी कॉर्ड,मोजणी 'क' प्रमाणपत्र मिळवणे जाचक अटी,वेळखाउपणा, वेळकाढूपणा आणि होणार्या भ्रष्टाचारामुळे,चुकीच्या मोजणीमुळे  नागरिकांना विनाकारण अनाधिकृतरित्या बांधकाम करण्यास भूमिअभिलेख विभाग भाग पाडत आहे, असा गंभीर आरोप, डॉ.चलवादी यांनी केला.शासनाने आणि संबंधित न्यायप्राधिकरणाने या समस्येकडे स्वत:हून लक्ष घालत, समस्या सोडवाव्यात. अन्यथा महिन्याभरानंतर रस्त्यावर उतरून बसपा स्टाईल आंदोलन केले जाईल.नागरिकांची गार्हाणी ऐकून घेण्यासाठी प्रशासनाने जबाबदार अधिकार्याचा मोबाईल क्रमांक आणि टोल फ्री नंबर जाहीर करण्याचे आवाहन देखील डॉ.चलवादी यांनी केले.


सर्वसामान्यांच्या अपीलकडे दुर्लक्ष

समस्यांसंबंधी अधिकाऱ्यांकडे केली जाणारी अपील केवळ आर्थिक निकषावरच ठरतात. तांत्रिकतेच्या आधारे निकाल दिला जात नाही. अपील गुणवत्तेच्या आधारे नाही, तर पैशांच्या आधारे निकाली काढली जाते. गुणवत्ता असलेल्या अपिलांना केराची टोली दाखवली जाते, असा दावा डॉ.चलवादी यांनी केला.

Post a Comment

0 Comments