Type Here to Get Search Results !

हडपसरमध्ये शिवसेनेची आढावा बैठक; भव्य रास दांडिया महोत्सव व पक्षबांधणीसाठी मार्गदर्शन..!!!

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे...

शारदीय नवरात्रीच्या पवित्र पर्वाच्या पहिल्या दिवशी हडपसर मतदारसंघातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची माझ्या निवासस्थानी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत नवरात्रीच्या निमित्ताने स्वर्गीय गंगुबाई संभाजी शिंदे नवरात्री फेस्टिवल 2025 अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भव्य रास दांडिया महोत्सवाबाबत सविस्तर चर्चा व नियोजन करण्यात आले. या महोत्सवामध्ये हडपसर मतदारसंघातील हजारो भक्तगणांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा यासाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.


बैठकीदरम्यान पक्षसंघटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण बाबींवरही चर्चा झाली. शिवसेनेच्या पक्षबांधणीचा विस्तार करताना प्राथमिक सदस्य नोंदणी तसेच सक्रिय सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात करून संघटनाला नवचैतन्य देण्याचे ठरविण्यात आले. या प्रक्रियेत शिवसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग वाढविण्यासाठी विशेष मार्गदर्शन देण्यात आले. स्थानिक स्तरावर पक्षाची पायाभूत रचना अधिक सक्षम करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने कार्य करावे, यावर भर देण्यात आला.


या बैठकीत भव्य रास दांडिया महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष तयारी व नियोजन अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, लोकनेते एकनाथ भाई शिंदे साहेब स्वतः उपस्थित राहणार असून, त्यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मान्यवर मंत्री महोदयही हजेरी लावणार आहेत. या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे रास दांडिया महोत्सव भक्तिमय सांस्कृतिक सोहळा व संघटनात्मक बळकटी व जनसंपर्काचा मोठा उपक्रम ठरणार आहे.


हडपसर मतदारसंघातील सर्व शिवसैनिक आणि नागरिकांनी या रास दांडिया महोत्सवात उत्साहाने सहभागी व्हावे, नवरात्रीच्या मंगलमय वातावरणात सामाजिक व सांस्कृतिक एकतेचा संदेश द्यावा, तसेच शिवसेनेच्या पक्षबांधणीच्या प्रयत्नांना चालना द्यावी, असे आवाहन या आढावा बैठकीत करण्यात आले.


#Navratri2025 #hadapsar #navratrifestival #Shivsena #punecity

Post a Comment

0 Comments