Type Here to Get Search Results !

शिक्षक दिनानिमित्त मलकापूर येथे नॅशनल आयकॉन अवॉर्ड संपन्न

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 


मलकापूर ...प्रतिनिधी...

शिक्षक दिनानिमित्त आयोजित नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025 कार्यक्रम मलकापूर येथील  भातृ मंडळ येथे आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमात महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातील आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला .

 हिंदी मराठी पत्रकार संघ  च्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील  कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी नॅशनल आयकॉन अवार्ड 2025 चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव ऑनलाइन मागवण्यात आले होते

त्यावेळी  855 प्रस्तावांपैकी निवड करून 150  मान्यवरांना नॅशनल आयकॉन पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. तसेच शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य कार्य करणाऱ्या 110 शिक्षकांचा सुद्धा नॅशनल आयकॉन अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला. 

नॅशनल आयकॉन अवार्ड  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रा. अनिल खर्चे (प्राचार्य व्ही. बी. कोलते इंजीनियरिंग कॉलेज) तर प्रमुख पाहुणे भाई अशांत वानखेडे संस्थापक समतेचे निळे वादळ, धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ,  बाळासाहेब दामोदर उद्योजक, ॲड सम्यक चवरे , दामोदर शर्मा शेतकरी नेते, विजयकुमार डागा, दिलीप आढाव  (प्राचार्य विद्या विकास विद्यालय ) सरिता पाटील  (प्राचार्य प्राथमिक मराठी आमची शाळा), विद्या काळबांडे (प्राचार्य  चांडक विद्यालय),डॉ. प्रदीप गायकी वाहतूक नियंत्रक नांदुरा होते

कार्यक्रमाची सुरुवात सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व प्रथम महिला संपादक तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. 

कार्यक्रमात पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक ,राजकीय ,कला, वैद्यकीय, वकील, उद्योजक अशा अनेक क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा सत्कार महाराष्ट्र नॅशनल आयकॉन 2025 देऊन करण्यात आला. 

या कार्यक्रमाप्रसंगी  देशासाठी आपल्या प्राणाची परवा न करता देशसेवा करणाऱ्या माजी सैनिकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

   महिलांसाठी मानाची असे समजले जाणारे आशा स्वयंसेविका  कार्यरत असणाऱ्या महिला  भगिनींचा सत्कार देखील या कार्यक्रमात करण्यात आला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र गंणगे सर यांनी  तर आभार प्रदर्शन प्रा. प्रकाश थाटे यांनी केले

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुधाकर तायडे, नथूजी हिवराळे, विनायक तळेकर, विजय भगत, मयूर लड्डा, आत्माराम मोरे, भाऊराव व्यवहारे ,राजू घाटे, अमोल वानखेडे, ऋषिकेश तेजेकर, मुकुंदा पाटील यांनी परिश्रम घेतले

 *नॅशनल आयकॉन अवार्ड 2025 पुरस्कार प्राप्त वितरण* 


शैक्षणिक 43, सामाजिक 


27, पत्रकारिता 42, स्थानिक शिक्षक 86, आरोग्य 28, प्रशासकीय विभाग 2, साहित्य 3, कृषी 3, उद्योजक 2, पर्यावरण 2, सामाजिक संस्था 2, कला 7, वैद्यकीय 7 क्रीडा 6

Post a Comment

0 Comments