Type Here to Get Search Results !

पत्रकार भवन येथे स्वयंसहायता गटांच्या प्रतिनिधींसाठी एक सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. स्किलेट्झ फाउंडेशन गेली चार वर्ष महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण या क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेने आत्तापर्यंत काही नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार


स्वयंसहायता गटांसाठी सक्षमीकरण कार्यशाळा

या उपक्रमांच्या अंतर्गत अनेक महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण, नोकरीच्या–व्यवसायाच्या संधी, त्यांच्या उत्पादन किंवा सेवांना योग्य बाजारपेठ मिळवून दिली आहे.

संस्थेने 12 तारखेला सक्षम ३६० ह्या नवीन प्रकल्पाची सुरुवात केली. या प्रकल्पांतर्गत महिला बचत गट म्हणजेच स्वयंसहाय्यता गटांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

उद्घाटनाला सुगम संगीत गायिका मीरा मसे यांनी आपल्या सुरेल स्वरात गणेश वंदना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली.



या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी सौ. प्रणोती यशवंत शितोळे या उपस्थित होत्या. प्रणोती ताई ह्या कोल्हापूर च्या ‘मी आत्मनिर्भर‘ आणि ‘अक्षय नारी शक्ती संघ‘ ह्याच्या त्या संस्थापकीय संचालिका आहेत. त्यांनी महिला स्वयंसहाय्यता गटांना मार्गदर्शन करत आर्थिक शिस्त, व्यवसाय विकास आणि परस्पर विश्वास, कर्ज घेण्याची योग्य पद्धत, कर्जाची परतफेड ह्याविषयी सविस्तर माहिती दिली.

"एक सशक्त स्वयंसहायता गट म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे, तर सामाजिक बदलाची सुरुवात आहे,"असे मत त्यांनी मांडले. यावेळी कोल्हापूर मधून आलेल्या काही स्वयंसहाय्यता गटांनी आपली आत्तापर्यंतची वाटचाल आणि मनोगत व्यक्त केले. 


कार्यक्रमाच्या पुढच्या सत्रात स्वयंसहाय्यता/ बचत गटांनी राबवलेले उपक्रम जसे की कला – कौशल्य प्रशिक्षण, व्यवसाय नियोजन, आर्थिक व्यवस्थापन आणि सामाजिक बांधिलकी या गोष्टींवर आधारित त्यांना मी सक्षम पुरस्कार 2025 ते गौरवण्यात आले.

महाराष्ट्रातून एकूण 30 गटांची निवड या साठी करण्यात आली होती. महाराष्ट्रातून पुणे, कोल्हापुर , पुणे , पिंपरी चिंचवड़ , मावळ , शिखरापुर , वारजे माळवाडी, शिवणे, इ. ठिकाणच्या गटांची निवड करण्यात आली.


दुसऱ्या सत्रामध्ये प्रमुख अतिथी असलेल्या ज्येष्ठ डॉक्टर आणि समाजसेविका डॉ. सुधा केकण, समाज विकास विभागाचे उपायुक्त श्री धनराज माळी, दैनिक केसरी वृत्तपत्राच्या सौ. कल्पना खरे आणि डॉ. सुधा ह्यांच्या कन्या डायना ह्या उपस्थित होत्या.

ह्यांच्या हस्ते निवड झालेल्या गटांना पुरस्कार देण्यात आले. भाषणांमध्ये डॉ. केकाण यांनी स्त्रियांच्या बदलत्या जबाबदाऱ्या, त्यांची वैद्यकीय सेवा आणि त्याच बरोबर त्यांची समाजसेवे साठीची ओढ ह्याविषयी सांगितले. 

श्री माळी ह्यांनी सक्षम महिला आणि सक्षम समाज कसा घडवता येईल आणि त्यासाठी कोणावरही अवलंबून न राहता महिलांनी कसे आत्मनिर्भर होता येईल ह्या विषयी मार्गदर्शन केले. सौ. खरे ह्यांनी गृहिणींनी त्यांच्या घरातल्या कामाविषयी काही कमीपणा न बाळगता कुटुंबाची काळजी घेत सातत्याने काहीतरी नवीन शिकणं आणि ते दैनंदिन कामात आत्मसात करावे असे सांगितले.

सक्षम प्रकल्पाच्या अंतर्गत राबवले जाणारे उपक्रम, त्यांच्या कुटुंबावर आणि समाजावर पडणारा प्रभाव. याविषयी संस्थेच्या संचालिका डॉ. मिताली मोरे ह्यांनी माहिती दिली. भारताचे स्वप्न असलेल्या 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी या संकल्पनेचा, स्वयंसहाय्यता गटांचा आणि सामाजिक संस्थांचा कसा हातभार लागू शकेल याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. 

कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातून 300 हून अधिक महिला बचत गटांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली होती.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. तेजश्री पुरंदरे यांनी केले. कार्यक्रमाची संकल्पना स्किलेट्झ च्या संचालिका सीए सोनाली सरीपल्ली , श्रुती पाटोळे आणि डॉ. मिताली मोरे ह्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या  संपूर्ण टीम - वनमाला चौधरी , राजश्री ताला , प्रीती खाड़े आणि पिंपरी चिंचवड़  टीम च्या राजश्री शुक्ल आणि रक्षा पाटील यांनी केले होते.

Post a Comment

0 Comments