Type Here to Get Search Results !

पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांद्वारे सार्वजनिक उद्याने बंद करण्याच्या आदेशाचा निषेध



मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार


_ 9 जून, पुणे:


प्रतिनिधी....

पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून सार्वजनिक उद्याने ईद च्या दुसऱ्या दिवशी बासी ईद ला बंद ठेवण्याचा अन्यायकारक आदेश देण्यात आला आहे. या आदेशामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन होत असून, संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांवर गदा येत आहे.


याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स या संघटना च्या प्रतिनिधी पुणे महानगर पालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे निषेध व्यक्त करणारे निवेदन सादर करण्यात आले. व भारतीय राज्य घटनेची प्रत देण्यात आले या निवेदनात नागरिकांचे हक्क अबाधित ठेवण्याची मागणी करण्यात आली असून, तात्काळ आयुक्तांनी मुस्लिम समाजाची माफी मागावी अशी विनंती करण्यात आली आहे.


सदर प्रसंगी महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स चे अध्यक्ष हाजी जुबेर मेमन, आझाद समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष सुलतान शहा, फरीद खान पुणे शहर अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम काॅनफरेस सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधानाच्या किमतीवर कुठलाही निर्णय मान्य केला जाणार नाही, असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला.


नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही!

Post a Comment

0 Comments