Type Here to Get Search Results !

स्वर्गीय तुकाराम भेंडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तकांचे वाटप

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार


पुणे..

स्वर्गीय तुकाराम भेंडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तकांचे वाटप करून, शिक्षणासाठी एक अनमोल प्रोत्साहन देण्यात आले.



 या उपक्रमाद्वारे केवळ पुस्तकांचे नव्हे, तर मुलांच्या स्वप्नांना, त्यांच्या जिद्दीला आणि उज्वल भविष्यासाठीच्या वाटचालीला बळ मिळाले.



या प्रेरणादायी कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री मा. रमेशदादा बागवे, माजी आमदार मोहनदादा जोशी, नगरसेवक अविनाश बागवे, पुणे शहर काँग्रेस जिल्हा कमिटीचे अध्यक्ष मा. अरविंद शिंदे, मा. चेतन अग्रवाल, मा. मेहबूबजी नदाफ, संयोजक मा. विकारअहमद मुक्तार शेख व निनाद धेंडे, मुक्तार शेख, माजी नगरसेवक  आणि काँग्रेस पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते, कार्यकर्ते तसेच मंगळवार पेठ येथील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील आत्मविश्वास आणि चेहऱ्यावरचे हास्यच या उपक्रमाच्या यशाची खरी पावती होती.


🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


Post a Comment

0 Comments