Type Here to Get Search Results !

शहरा’तील वाहतूक कोंडीचे ऊत्तर, ‘वाहतूक_नियोजना’ पेक्षा नियंत्रित व मर्यादित बांधकामाच्या नियोजनात आहे* - काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार


*शहरा’ची सुसह्य वहातुक व व्हीजीटर्स पार्किंग स्पेस उपलब्ध होई पर्यन्त, अतिरिक्त चटई क्षेत्र (रद्द न करता) स्थगित वा नियंत्रित करावे* 

.. राजीव गांधी स्मारक समितीची मागणी

*मेट्रो-सिटी साठीचा धोरणात्मक “डीपी व टीपी” करणे वेळीच गरजेचे होते*…   -     

-  काँग्रेस’ची टिका 

पुणे -  दि ५ जून 

पुणे मनपा नवनियुक्त आयुक्त मा श्री नवलकिशोर राम यांना, आज “राजीव गांधी स्मारक समिति” तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. 

या वेळी “पुणे शहराचा विकास, वहातुक कोंडींची ज्वलंत समस्या, आरोग्य सेवा व पुणे मनपा प्रशासन कालीन ऑडिट रिपोर्ट” इ बाबत मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  मा आयुक्तांचा तिरंगा उपरणे व श्रीमंत छत्तपती शिवाजी महाराजांची प्रतिमा (व शिव मुद्रेचे पेन).. देऊन सन्मान करण्यात आला..!

यावेळी स्मारक समिति’चे संस्थापक अध्यक्ष, काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात लिगल सेलचे अँड फैयाज शेख, अँड श्रीकांत पाटील, धनंजय भिलारे, गणेश शिंदे, संजय अभंग, गणेश मोरे, योगेश भोकरे, आशीष गुंजाळ इ उपस्थित होते..!

   आयुक्त श्री नवलकिशोर राम यांना दिलेल्या निवेदनात, 

अभिनंदन व शुभेछा व्यक्त करून पुणे शहराच्या ज्वलंत समस्यांकडे लक्ष वेधले आहे.. तसेच प्रशासकीय काळातील भ्रष्टाचाराच्या आरोपावर प्रशासनाचे पुणेकर जनतेस अपेक्षीत ऊत्तर दाखल गेल्या ३ वर्षांचे ऑडीट अहवाल प्रकाशीत करून कार्यवाही बाबत नविन आयुक्तांनी माहीती देण्याची मागणी देखील केली आहे. 

तसेच नविन आयुक्तां समोर अनेक प्रलंबित कामाची व मनपा निवडणुक घेण्याची आव्हाने देखील आहेत. 

विशेष करून, 

पुणे शहरातील “वाढती वाहतूक कोंडीची ज्वलंत समस्या’ लक्षात घेता,  मेट्रो’ इ चा अतिरिक्त एफएसआय व बाहेरील टीडीआर (विकतचे चटई क्षेत्र) इ ची उधळण मोठ्या प्रमाणात सुरू असून, पुणे शहरातील वर्षा नु वर्षांच्या पुर्वीच्याच रस्त्यांवरील प्लॉट वर सू २० ते ३० मजली इमारतींना आवश्यक वहातुक सोई विना परवानग्या दिल्या जात आहेत हे भयावह आहे. सदर इमारती मधील किमान १० ते १५ % नागरिक वा त्यांचे व्हिजिटर्स जरी ‘एक ठिकाणाहून दुसरीकडे’ जावयाचे झाल्यास, रस्ते अत्यंत तोकडे पडत आहेत ही वास्तवता नाकारु शकत नासल्याचे ही निवेदनात म्हंटले आहे. 

पुणे शहराचा “रुंदावणारा-होरीझोंटल व समतोल विकास” होण्याऐवजी,  “व्हर्टीकल-उंचवणारा विकास” होत असल्याने, “गर्दीयुक्त वाहतूकीच्या खाईत पुणे शहर ढकलले जात आहे. 

त्यामुळे ‘वाहतूक नियोजन’ ही समस्या नसून, इमारतींचे अयोग्य नियोजन व अवास्तव बांधकाम परवानगी या समस्या आहेत.  

पुणे शहराचे “डीपी (विकास आराखडा) वा टीपी (नगर रचना)” हे मात्र कागदांवर पूर्वीचेच असून, 

मेट्रो’च्या आगमना नंतर वास्तविक “डीपी व टीपी मध्ये धोरणात्मक आमूलाग्र बदल “होणे गरजेचे होते, 

मात्र ते वेळीच न झाल्याने पुणे शहर आज वाहतुकीच्या कोंडीत अडकले आहे. 

मेट्रो’चा पुरेपूर उपयोग होण्याच्या दृष्टीने “प्रत्येक मेट्रो स्टेशन जवळ मुबलक दोनचाकी व चारचाकी पार्किंग व्यवस्था” अत्यावश्यक होती. 

मात्र ती दुर्दैवाने उभी राहू शकली नाही. त्या मुळेही आपण या समस्येचा तातडीने बोध घेऊन, मा नगर रचना संचालक यांचे समवेत चर्चा करून ‘पुणे शहरा’साठी आवश्यक रुंदीच्या रस्त्यांची व पार्किंगची व्यवस्था होई पर्यन्त तसेच मेट्रो-सिटी’साठीचा “डीपी व टीपी” होई पर्यन्त, मुक्त व अतिरिक्त चटई क्षेत्र मंजूरी (रद्द न करता) तूर्त स्थगित वा नियंत्रित करावी, जेणे करून पुणेकरांची नित्य व जीवघेण्या वाहतूक कोंडीतून सुटका होईल अशी मागणी देखील निवेदनात केली आहे.                      

तसेच पुणे मनपा निवृत्त सेवकांना ७व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मनपा सर्व साधारण सभा व शासन परिपत्रक नुसार सत्वर देणे बाबत ही वाच्यता केली आहे. 

पुणे मनपा आरोग्य विषयक सुविधा, वाढत्या शहरीकरणाच्या गरजे नुसार हॉस्पिटल्स व तपासणी केंद्रांची उभारणी कडे ही राजीव गांधी स्मारक समितीने लक्ष वेधले आहे..

———“”””””——————————-////———-


Post a Comment

0 Comments