Type Here to Get Search Results !

सालाबादप्रमाणे यंदाही पालखी सोहळ्यात राज्यभरातून, विशेषतः परभणी, यवतमाळ, परंडा, बुलढाणा आणि हिंगोली येथून हजारो वारकरी मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले. या पावन सोहळ्यानिमित्त, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठान व समर्थ प्रतिष्ठान यांच्यावतीने वारकरी मंडळींसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार


पुणे..

पालखी सोहळा २०२५ 

श्रद्धा, सेवा आणि एकतेचा उत्सव! 


सालाबादप्रमाणे यंदाही पालखी सोहळ्यात राज्यभरातून, विशेषतः परभणी, यवतमाळ, परंडा, बुलढाणा आणि हिंगोली येथून हजारो वारकरी मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले.



या पावन सोहळ्यानिमित्त, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठान व समर्थ प्रतिष्ठान यांच्यावतीने वारकरी मंडळींसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.



या कार्यक्रमाची सुरुवात माजी गृहराज्यमंत्री मा. रमेशदादा बागवे यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची पूजा व आरती करून झाली.



यावेळी प्रभागाचे कार्यसम्राट नगरसेवक मा. अविनाशजी बागवे, सौ. इंद्राताई बागवे उपस्थित होते. वारकरी वारी हा एकतेचा सोहळा आहे याची प्रचिती नेहमीच येते. या सोहळ्यात सर्व धर्माच्या म्हणजेच गौड ब्राह्मण, लिंगायत, ख्रिस्ती, मुस्लिम बांधवानी एकत्र येऊन वारकऱ्यांची सेवा केली. माणसातील माणूस शोधून त्याची सेवा करणे हे वारी नेहमीच आपल्याला शिकविते. यावेळी मातंग एकता आंदोलनाचे समन्वयक विठ्ठलजी थोरात, अरविंद गायकवाड, सुरेखाताई खंडागाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments