मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
पुणे...प्रतिनिधी....
कर्तुत्वान अधिकारी नवल किशोर राम यांची पुणे महानगरपालिकेच्य आयुक्तपदी निवड झाल्यामुळे पुणेकरांचे भवितव्य उज्वल होणार - डॉ. हुलगेश चलवादी................
पुणे दि.४- पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून निवड झाल्याबद्दल नवल किशोर राम यांची बहुजन समाज पार्टीच्या वतीने महात्मा फुले पगडी, भारतीय संविधान व शॉल देऊन बसपाच्या प्रदेश महासचिव व पश्चिम महाराष्ट्र मुख्य झोन प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कोरोना काळात खऱ्या अर्थाने कोविड योद्धा म्हणून काम केलेले नवल किशोर राम यांची आयुक्तपदी निवड झाल्यामुळे पुणेकरांचे भविष्य यामुळे उज्वल होणारा असल्याचे चलवादी यांनी सांगितले. कार्यक्रमास पुणे जिल्हाध्यक्ष अशोकजी गायकवाड ,पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक महेश जगताप , पुण्याचे प्रभारी अनिल त्रिपाठी , प्रभाकर खरात, शफी शेख ,पश्चिम महाराष्ट्र बामसेपचे रवींद्र चांदणे कार्यकारणी सदस्य पी .आर. गायकवाड ,वडगाव शेरी मतदार संघाचे युवा नेते आकाश डावकर आधी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments