मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
दिनांक ३ जून २०२५, पुणे:-
राज्यभरात गाजत असलेले वैष्णवी हगवणे-कस्पटे मृत्यू प्रकरणाला वेगळ वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे.हगवणे कुटुंबियांचे वकील अत्यंत खालच्या स्तरातील असंवेदनशील विधाने करून पीडिता व तिच्या कुटुंबियांचे चरित्रहनन करीत मा.न्यायालयाची दिशाभूल करीत आहे.अशा वकिलाला प्रॅक्टिस करण्यापासून त्यामुळे वेळीच रोखण्यात यावे,अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी मंगळवारी (ता.३) केली.
नुकतेच डॉ.चलवादी, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत पीडित कस्पटे कुटुंबियांची भेट घेत त्यांच्या दुःखात सहभागी झाले.बसप पीडित कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे,असा विश्वास यानिमित्ताने डॉ.चलवादी यांनी दिला.हगवणे यांचे वकील ऍड.दुशिंग यांनी न्यायालयात वैष्णवी विरोधात खालच्या स्तरातील युक्तिवाद केला आहे.
अशाप्रकारे मृत पीडितेची अवहेलना करणे अत्यंत निंदनीय आहे.ही बाब वकिली पेशाला काळिमा फासणारी आहे.बार कॉन्सिल ऑफ इंडिया आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ने यांसदर्भात दखल घेत, दुशिंग यांची सनद तात्काळ रद्द करावी,अशी स्पष्ट मागणी बसपची असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.
दुशिंगे यांचे वर्तन न्यायप्रक्रियेचा गैरवापर असून, त्यांचा युक्तिवाद केवळ पीडितेची अवहेलना करणारा नाही, तर घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानातून दिलेल्या स्त्रियांच्या प्रतिष्ठेच्या अधिकाराचा आणि मानवी हक्कांचा थेट अपमान आहे. वकिलांची भूमिका सामाजिक जाणिव आणि नीतिमत्तेनी परिपूर्ण असावी.परंतु दुशिंग यांनी मुळातच आपल्या वकिलीच्या कर्तव्यात सामाजिक जबाबदारीचे भान सोडून दिले आहे, हॆ त्यांच्या वर्तनावरून अधोरेखित होत असल्याचे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.
केवळ स्वस्त प्रसिद्धीसाठी कुठलेही पुरावे नसतांना दुशिंग यांच्याकडून हॆ खालच्या स्तराचे आरोप करण्यात आले आहेत, असा दावा डॉ.चलवादी यांनी केला.दुशिंग यांच्या विरोधात २०२२ मध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.सरकारी वकिलाची कॉलर पकडून त्यांना मारहाण केल्याचा गुन्हा वडगाव मावळ पोलीस ठाण्यात दुशिंग यांच्यावर दाखल आहे.सहकारी वकिलावरच हल्ला करण्याची दुशिंग यांची मानसिकता तसेच पेशाबद्दलची असंवेदनशीलता यावरून दिसून येते.अशा वकिलाला प्रॅक्टिस करण्यापासून रोखने आवश्यक असल्याचे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले आहे.
.jpg)
.jpg)
Post a Comment
0 Comments