महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना जीवे मारण्याची धमकी..
सिद्धार्थ भोकरे यांनी दैनिक जनप्रवास या वृत्तपत्रातून असे म्हटले होते की, पाकिस्तान मधील क्रिकेट खेळाडू जसे पाकिस्तान प्रेम दाखवतात तसे प्रेम बॉलीवूडमधील खान बंधू अभिनेते आपल्या देशाबद्दल उघडपणे भारत प्रेम का दाखवत नाही?
आपण देखील भारताच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत असे खान बंधूंनी देखील देशप्रेम दाखवायला हवं होतं.... असे वृत्त प्रसिद्ध होताच काही अज्ञात इसमांनी निनावी पत्राद्वारे, "तू आठ दिवसात माफी माग अन्यथा तुला गोळीबार करून उडवून देऊ" अशी धमकी दिली आहे. या धमकीचा राज्य पत्रकार संघाच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात येत असून, राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सिद्धार्थ भोकरे यांना पोलिस संरक्षण देऊन, आरोपींचा शोध घेऊन करून कठोर कार्यवाही करण्यात यावी,
अशी मागणी राज्य पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहे.


Post a Comment
0 Comments