Type Here to Get Search Results !

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह (नवीन) येरवडा येथे अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईनपद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 


*वसतिगृहात प्रवेशाकरीता अर्ज करण्याचे आवाहन*


  पुणे दि. 19 : सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह (नवीन) येरवडा येथे अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org   या संकेतस्थळावर ऑनलाईनपद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 


कनिष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन, शासकीय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यास वसतिगृहात विनामुल्य निवास, अंथरुण, पांघरुण, भोजन, पुस्तके, स्टेशनरी, इतर शैक्षणिक बाबींकरीता आर्थिक सहाय्य तसेच दरमहा निर्वाह भत्ता आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments