Type Here to Get Search Results !

प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांना विविध वाहतूक संघटनांच्या वतीने निवेदन .:

 


अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे



 पुणे (दि.२०) बहुउद्देशीय वाहतूक चालक मालक माथाडी मंडळ,निर्भय महाराष्ट्र व अन्य संघटनांच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांना बारामती आरटीओ येथील भ्रष्टाचार, अधिकारी गैरवर्तन व त्यामुळे होणारा त्रास याबद्दल निवेदन देण्यात आले.शिष्टमंडळाचे नेतृत्व शिखर वाहतूक चालक मालक महासंघ भारतचे अध्यक्ष डॉ.एच.जी पाडुळे यांनी केले. 


आरटीओ ऑफिस पुणे येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत घोलप,उपशहर अध्यक्ष विजय तावरे,पिंपरी चिंचवड जिल्हाअध्यक्ष संग्राम पाटील,आशुतोष येरेलु,शशिकांत थोरात,दत्तात्रय झेंडे,सचिन राठोड,सुनिता निंबाळकर आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 या प्रसंगी प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आणि संस्थांच्या वतीने करण्यात येणारे उपोषण थांबविण्याचे आवाहन केले.त्याला प्रतिसाद देत हे उपोषण स्थगित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments