Type Here to Get Search Results !

मातंग समाजाच्या हक्कासाठी भव्य #जनआक्रोश_महाआंदोलन! सकल मातंग समाज महासंघ, राज्य यांच्या वतीने २० मे २०२५ रोजी आजाद मैदान, मुंबई येथे मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी भव्य जनआक्रोश महाआंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार


मुंबई......

या आंदोलनाच्या पूर्वनियोजनासाठी दिनांक १४ मे २०२५ रोजी, स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे नियोजन बैठक पार पडली.


या वेळी मार्गदर्शन करताना मा. रमेशदादा बागवे (माजी गृहराज्यमंत्री व संस्थापक अध्यक्ष - मा. ए. आं. महा, राज्य) यांनी समाजाच्या संघटित लढ्याची गरज अधोरेखित केली. यावेळी  पुणे महानगर पालिकेत सुरक्षा विभागात जो भ्रष्टाचार सुरू आहे त्यावर प्रकाश टाकत पुण्याचे मा. आयुक्त साहेब यांना लेखी निवेदन दिले व चौकशीची मागणी यावेळी केली. बैठकीस विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली यात मा. आमदार अमित गोरखे, मा. आमदार सुनिल कांबळे, मा. दिलीप कांबळे (माजी मंत्री), मा. नितेश अंतापुरकर (आमदार),मा. आमदार ससाणेसाहेब

मा. विजय अंबुरे, सुभाष जगताप, अशोक लोखंडे (अध्यक्ष – लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती)

मा. उत्तम खंदारे, मारुती वाडेकर, अनिल हातागळे यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक व संघटनात्मक नेतृत्व उपस्थित होते.


#JanAakroshAndolan #JanaAakroshMahaAndolan


🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


Post a Comment

0 Comments