मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे.....
मातंग समाजाच्या हक्कासाठी भव्य #जनआक्रोश_महाआंदोलन...
मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी सकल मातंग समाज महासंघ, राज्य यांच्या वतीने २० मे २०२५ रोजी आजाद मैदान, मुंबई येथे भव्य जनआक्रोश महाआंदोलन आयोजित करण्यात येत आहे.
आज आयोजित पत्रकपरिषदेत सर्व माध्यमांना या महाआंदोलनाची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी, मा. रमेशदादा बागवे (माजी गृहराज्यमंत्री व संस्थापक अध्यक्ष - मा.ए.आं. महा.राज्य) यांनी समाजाच्या संघटित येण्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे विष्णुभाऊ कसबे, माजी नगरसेवक सुभाषजी जगताप, अविनाशजी बागवे, अशोकजी लोखंडे, स्वातिताई लोखंडे, आनंदजी अडागळे, मातंग एकता आंदोलनाच्या पुणे शहर अध्यक्षा राजश्रीताई अडसूळ, तसेच एडव्होकेट एकनाथ सुगमवर यांसह पक्षाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
मातंग समाजाच्या हक्कांसाठी ही लढाई एकजुटीने लढवावी लागेल, असं स्पष्ट करत समाजाने आपल्या एकतेचा संदेश दिला. आज एकजुटीने लढा सर्वानी या जन आक्रोश आंदोलनात सहभागी व्हा.
#TirangaYatra #OperationSindoor #Pune #IndianArmy #NationFirst #जयहिंद
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
#अविनाश_रमेशदादा_बागवे
नगरसेवक, पुणे मनपा
कार्याध्यक्ष, मातंग एकता आंदोलन, महाराष्ट्र राज्य
@highlights
@followers
#congress #incpune #avinashbagwe #rameshbagwe

Post a Comment
0 Comments