Type Here to Get Search Results !

आज खडकवासला मतदारसंघाचे आमदार मा. श्री. भीमरावजी तापकीर व राज्यमंत्री माधुरी ताई मिसाळ यांनी फनटाईम सिनेमा परिसरात पाहणी केली.

 


अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

पुणे......

राजाराम पुल ते फनटाईम सिनेमा उड्डाणपुलाचे काही दिवसांपूर्वी लोकार्पण झाले. या पुलामुळे वाहतूक समस्येवर प्रभावी तोडगा निघाला असला तरीही फनटाईम सिनेमाजवळ काही प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. असे निदर्शनास आल्यानंतर आज खडकवासला मतदारसंघाचे आमदार मा. श्री. भीमरावजी तापकीर व राज्यमंत्री माधुरी ताई मिसाळ यांनी फनटाईम सिनेमा परिसरात पाहणी केली. 


यावेळी अप्पर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील यांच्यासह महानगरपालिका आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वाहतूक कोंडी सोडवण्यासंदर्भात सदर संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांना योग्य त्या सूचना दिल्या. 


यावेळी माजी नगरसेवक श्री. श्रीकांत जगताप, श्री. प्रसन्न जगताप, श्री. हरिदास चरवड, सौ. मंजुषा नागपुरे, श्रीमती ज्योती गोसावी, सौ. श्रावणी जगताप, श्री. बाळासाहेब आखाडे, श्री. सचिन मोरे, श्री. राजू कदम, श्री. प्रशांत थोपटे, श्री.निखिल शिळीमकर, मनोज नाशिककर , श्री.प्रतिक देसर्डा, मुख्य अभियंता (प्रकल्प) श्री. युवराज देशमुख, मुख्य अभियंता (पथ) श्री. अनिरुद्ध पावस्कर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिलीप दीगाडे, अधीक्षक अभियंता श्री. साहेबराव दांडगे, श्री. संदीप रणवरे, उप अभियंता (पथ) नरेश रायकर, कनिष्ठ अभियंता (पथ) नेहा कोलते, उप अभियंता (प्रकल्प) पवन मापारी, कनिष्ठ अभियंता (प्रकल्प) संभाजी कवठे, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय, पुणे महानगरपालिका प्रभारी सहाय्यक आयुक्त श्री. तिमय्या जंगले, उप अभियंता श्री. विजयकुमार वाघमोडे यांच्यासह स्थानिक नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

.

.

.

.

@bhimraotapkir 

#madhurimisal #sinhagadroad #traffic 

#sinhagadroadpune #flyover #punecity #bjp4viksitbharat

Post a Comment

0 Comments