Type Here to Get Search Results !

बाणेर-बालेवाडीत अभूतपूर्व उत्साह !!!

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


पुणे.....

मंगळवारी सकाळीच कोथरूड विधानसभा मतदारसंघातील बाणेर-बालेवाडी परिसरात रॅली काढली. हा थोडासा विखुरलेला परिसर असला आणि पश्चिम पुणं म्हणून नवी ओळख निर्माण करत असताना इथली माणसं मात्र कमालीची आपुलकीची आहेत. साऱ्यांनीच प्रचंड उत्साहात रॅलीचं स्वागत केलं. भगिनींनी औक्षण करायला येणं, तरुण-तरुणींची सेल्फीसाठी झुंबड उडणं, घोषणा देणं, अनेक कार्यकर्त्यांची भेटण्यासाठीची, काहीतरी सांगण्यासाठीची लगबग... हे सारंच कमालीचं आनंद देऊन जातंय.       




सुतारवाडी गावठाणातील मारुती भैरवनाथ मंदिरापासून सुरू झालेली ही रॅली शिवनगर, साई चौक, सूस रोडमार्गे पाषाण, शिवशक्ती चौक, बालाजी चौक, वाकेश्वर चौक, पूनम बेकरी, ढेरे बखळ, कॉसमॉस बँक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पाषाणचे भैरवनाथ मंदिर, लमाण तांडा, विधाते वस्ती बाणेर, मेडीपॉइंट हॉस्पिटल, ताम्हणे चौक, शिवाजी महाराज चौक बाणेर, राघूनाना चौक, बालेवाडी फाटा, बालेवाडी गाव या परिसरात फिरली. शेवटी बालेवाडी येथे तिचा शानदार समारोप झाला.




या रॅलीत बोलताना पुन्हा एकदा आवर्जून विकसित भारताची आणि देश-विकासातील अनेक योजना पुण्याच्या पदरात पाडून घेण्याची सुवर्णसंधी आपल्याला चालून आली आहे. त्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना खंबीर साथ देऊया, असे आवाहन केले. त्याला जोरदार निर्धार करीत सर्वांनीच प्रतिसाद दिला. 




या रॅलीत माझ्यासोबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील, खा.प्रा. मेधाताई कुलकर्णी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, मा. नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


#punewithmodi #MurlidharMohol4Pune #ModiKiGuarantee #ModiAgainIn2024 #Pune #पुणे #Loksabha #लोकसभा #PhirEkBaarModiSarkar #पुण्यात_कमळ_मोदींसाठी_मोहोळ

Post a Comment

0 Comments