Type Here to Get Search Results !

रवींद्र धंगेकर यांनी वडगांव शेरीकरांच्या प्रेम, आशीर्वाद आणि स्वागताबद्दल मानले आभार!

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


पुणे.....

📍 वडगांव शेरीकरांच्या प्रेम, आशीर्वाद आणि स्वागताबद्दल धन्यवाद!

पुणे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने वडगांवशेरी येथे संपन्न झालेल्या पदयात्रेला वडगांव शेरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

अलोट गर्दी, उत्स्फूर्त प्रतिसाद, जल्लोषपूर्ण वातावरण आणि सर्वसामान्य जनतेचा मिळणारा पाठिंबा यातून ही पदयात्रा वेगळाच अनुभव देऊन गेली.  यावेळी ठिकठिकाणी श्री गणेश मंदीर, श्रीराम मंदीर, हनुमान मंदिर, तुकाईमाता मंदिराला भेट देत मनोभावे दर्शन घेतले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन देखील केले. यावेळी औक्षण करत माता- भगिनींनी स्वागत केले.


यावेळी सर्वांशी संवाद साधत त्यांच्या प्रेम आणि शुभेच्छांचा स्वीकार केला. त्याचबरोबर पुणे लोकसभा निवडणुकीत "हाताचा पंजा" या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी मला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन देखील मी यावेळी केले.


#पदयात्रा #padyatra #RavindraDhangekar #congress #JeetegaINDIA

#LokSabhaElection2024 #PuneLoksabha

Post a Comment

0 Comments