मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे....
“लोकसभा निवडणूक २०२४” साठी पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर व मावळ या चारही लोकसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणूक नियोजन बाबत महायुतीच्या सर्व महिला पदाधिकार्यांची समन्वय बैठक गुप्ते मंगल कार्यालय येथे पार पडली.
यावेळी महायुतीचे पुणे जिल्ह्यातील सर्व उमेदवार, बारामती लोकसभा मतदारसंघातून सौ. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार, पुणे लोकसभा मतदारसंघातून मा. मुरलीधर मोहोळ, शिरूर लोकसभा मतदारसंघातून मा. शिवाजीराव आढळराव पाटील तसेच मावळ लोकसभा मतदारसंघातून मा. श्रीरंग बारणे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी प्रचार नियोजन, बूथ, मतदान केंद्र नियोजन अशी निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक ती जबाबदारी पार पाडू असा सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी निर्धार केला.
सदर समन्वय बैठकीस राज्यसभा खासदार सौ. मेधा कुलकर्णी, महायुतीचे पुण्याचे उमेदवार मा. मुरलीधर मोहोळ, युवासेना सचिव मा. किरण साळी, मा.महापौर राजलक्ष्मी ताई भोसले, आर. पी. आय.चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. मंदार जोशी, आर. पी. आय. प्रदेश सचिव सौ. अर्चिता जोशी, आर.पी.आय.चे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणेआदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष मा. दीपक मानकर, भाजपचे पुणे शहराध्यक्ष मा. धीरज घाटे, भाजपचे प्रवक्ते मा. संदीप खर्डेकर, शिवसेना शहराध्यक्ष मा. अजय भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. दत्ताभाऊ सागरे यांनी या बैठकीचे संयोजन केले होते.
सदर बैठकीस महायुतीच्या महिला विधानसभा अध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला, युवक, युवती, विद्यार्थी,अल्पसंख्याक, सामाजिक न्याय सह सर्व सेलचे महिला पदाधिकारी, महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी आदी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments