Type Here to Get Search Results !

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास बहुजन समाज पार्टीचे झोन प्रभारी महाराष्ट्र महासचिव डॉ हुलगेश चलवादी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


पुणे.....

बहुजन समाज पार्टी पुणे जिल्हा पुणे शहराच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास बहुजन समाज पार्टीचे झोन प्रभारी महाराष्ट्र महासचिव डॉ हुलगेश चलवादी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बाबा आपका मिशन अधुरा, बी एस पी करेगी पुरा हा संदेश बहुजन समाजाला देण्यात आला. भारतीय संविधानाचे रक्षण बहुजन समाज पार्टी करू शकते हा विश्वास डॉ चलवादी  यांनी व्यक्त केला 

यावेळी बसपाचे पुणे झोन प्रभारी प्रदेश सचिव सुदीप जी गायकवाड, पुणे जिल्हा प्रभारी महंमद शफी, पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप कुसाळे, जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब कुदळे, पुणे जिल्हा महासचिव ऍड अतुल सोनावणे, जिल्हा सचिव सुरज खैरकर, पुणे जिल्हा रमेश गायकवाड,पुणे जिल्हा उत्तर भारतीय अध्यक्ष अनिल त्रिपाठी,पुणे शहर प्रभारी राजेश इंद्रेकर,पुणे शहर उपाध्यक्ष तन्वीर सय्यद,पुणे शहर महासचिव सागर खंडे, पुणे लोकसंभा प्रभारी मेहमूद जकाते, पुणे लोकसभा अध्यक्ष गजेंद्र आल्हाट, शिरूर लोकसभा प्रभारी बाळासाहेब आवारे, पुणे शहर युवक अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, , पुणे कॅन्टोमेंट अध्यक्ष कैलास ओहळ, वाडगाव शेरी अध्यक्ष संदीप कांबळे,  शिवाजी नगर अध्यक्ष रवी गायकवाड, हडपसर अध्यक्ष राजेंद्र राऊत मनोज कसबे, नितीन दामोदरे, प्रभाकर खरात, संजय शेंडगे, रमाकांत खंडे मिलिंद भोसले, लीना गेडाम,  कन्हया जैस्वार प्रवीण कांबळे आदी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments