मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे.......
*अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस तर्फे महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे शिवाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा*
पुणे -लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार कार्यासाठी काँग्रेस भवन येथे प्रेस रूमचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष व समन्वयक अरविंद शिंदे, उमेदवार रवींद्र धंगेकर आणि अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष, माजी आमदार व प्रचार प्रमुख मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड,अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय महामंत्री सुधाकरन पनीकर , काँग्रेसच्या नेत्या शोभना पनीकर,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्ष पूजा आनंद, माध्यम समन्वयक प्रवीण प्र वाळिंबे व राज अंबिके,पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सफाई कर्मचारी सेल अध्यक्ष दीपक निनारीया , पुणे शहर जिल्हा सफाई मजदुर काँग्रेसचे अध्यक्ष विनोद निनारीया,अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेसच्या प्रदेश महिला सचिव रेखा राजे ,बॉबी डिका,राजपाल गलोत, शैलेश चव्हाण विजय चंडालिया ,तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसतर्फे विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुण्यातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे शिवाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.
या प्रेस रूम मधून रोज सर्व प्रिंट मिडिया, इलेक्ट्रोनिक मिडिया व सोशल मिडिया यांना दरोजच्या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे मेळावे, पदयात्रा, जाहीर सभा, कोपरा सभा, पत्रकार परिषदा, आदीच्या बातम्या व फोटो पाठवले जाणार आहेत.


Post a Comment
0 Comments