Type Here to Get Search Results !

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त डीसीएम सोसायटीमध्ये महिलांसाठी आरोग्य शिबिर संपन्न*




मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज 


पुणे.....प्रतिनिधी..

 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नाना पेठ अहिल्या आश्रम मध्ये डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कला महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या मातांचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरामध्ये रक्तगट तपासणी. हिमोग्लोबिन तपासणी. रक्तातील साखर तपासणी. ब्लड प्रेशर तपासणी. उंची व वजन तपासणी. आदींची तपासणी करण्यात आली होती.या आरोग्य शिबिरासाठी "सुगत क्लिनिक" मधील डॉ कपिल जगताप,डॉ समीर मोमीन,डॉ राजेंद्र शिंदे, डॉ मीनहाज हसन आदींचे सहकार्य लाभले या शिबिरामध्ये सुमारे 200 महिलांची तपासणी करण्यात आली . 




यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डी.टी रजपूत सर. संस्थेचे जनरल सेक्रेटरी विशाल भाऊ शेवाळे,खजिनदार सिद्धार्थ शेवाळे, मुख्याध्यापिका शिल्पाताई भोसले, संस्थेचे प्रतिनिधी वर्षाताई पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भारती सहस्त्रबुद्धे,उपप्रचार्य डॉ नरेश पोटे, डॉ जे.के म्हस्के,डॉ तेजपाल कांबळे, डॉ प्रवीण कांबळे,प्रा रणजीत देशमुख,प्रसाद कर्डिले,डॉ नरेश शिशुपाल,डॉ राजकुमार गांधीले,प्रा पंकज जगताप,प्रा. प्रीती  वठरकर, किशोर भुजबळ,डॉ.जयश्री कांबळे. आदि यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ रूपाली भागवत यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा प्रणाली भोसले यांनी मानले

Post a Comment

0 Comments