मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे: वैद्यकिय क्षेत्रातील महिला डॉक्टरांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा, महिलांमधील कर्करोग व एकंदरीत आरोग्य जनजागृतीसाठी 'मेडीक्वीन क्लब ग्लोबल' या संस्थेकडून “मेडि आयकॉन अवॉर्ड 2024”'चे आयोजन करण्यात आले होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माजी आमदार जगदीश मुळीक, अभिनेत्री किशोरी शहाणे-वीज, अभिनेते समीर धर्माधिकारी आणि सौरभ गोखले यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले होते. यावेळी मेडिक्वीनच्या संस्थापिका डॉ. प्रेरणा बेरी, सचिव डॉ. प्राजक्ता शहा उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. पुष्पलता इंगळे - उत्कृष्ट आयुर्वेद शिक्षिका, डॉ. प्रिती नाईकनवरे - आयुर्वेदिक औषधांमध्ये उत्कृष्टता, डॉ. विजया बल्लाळ - सर्वोत्कृष्ट त्वचा आणि सौंदर्यप्रसाधने, डॉ. श्वेता भारती - सर्वोत्कृष्ट रेडिओलॉजिस्ट, डॉ.चंचल बोडके - सर्वोत्कृष्ट रेडिओलॉजिस्ट, डॉ. शलाखा जयकर - ठाण्यातील सर्वोत्कृष्ट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. स्मिता देशमुख - बेस्ट जनरल प्रॅक्टिशनर, डॉ. रुपा तिवारी - सर्वोत्कृष्ट फिजिओथेरपिस्ट, डॉ. संपदा बेंडे - सर्वोत्कृष्ट आयुर्वेद अभ्यासक, डॉ. रुपाली धवन - सर्वोत्कृष्ट स्त्रीरोग तज्ञ, डॉ.सविता पोटदुखे - सर्वोत्कृष्ट स्त्रीरोग तज्ञ, डॉ. प्रियांका मोहेकर - सर्वोत्कृष्ट कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट, डॉ.अनिता साबळे - बेस्ट रेडिओलॉजिस्ट ठाणे, डॉ. रुपाली भोये - बेस्ट डायबेटोलॉजिस्ट, डॉ. सोनल लोढे पाटील यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
मेडीक्वीन क्लब ग्लोबल ही संस्था महिलांच्या आरोग्यासाठी गेली पाच वर्ष काम करत आहे. महिला आरोग्य हे अजूनही खूप दुर्लक्षित आहे. त्यामुळे सर्व पॅथी मधील महिला डॉक्टरांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे या उद्देशातून मेडिक्विनच काम सुरू झाले. ड्रीम, अचिव्ह, इन्स्पायर हे मेडिक्विंनचे ब्रीदवाक्य आहे. महिला आरोग्याबद्दल जागरुकता निर्माण करणे, त्यावर उपाययोजना करण्यासाठी महिलांना प्रवृत्त करणे आणि महिला डॉक्टरांना जे महिला आरोग्यासाठी काम करतात त्यांना प्रोत्साहित करणे त्यांच्या कामाबद्दल सन्मान करणे हा उद्देश मेडिक्विनचा असल्याचे यावेळी डॉ. प्रेरणा बेरी म्हणाल्या.

Post a Comment
0 Comments