मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे......
- ठराव :-
१) आदरणीय पंतप्रधान मोदी सरकारने २०२१ साली पारित केलेल्या तीन कृषी विधेयक कायद्यांना पुन्हा एकदा लागू करावे. व या कायद्यांना रयत क्रांती संघटनेचा पूर्णपणे पाठिंबा आहे.
* शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य कायदा 2020,
* शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020,
- अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा 2020.
२) आयात-निर्यात धोरण पाच वर्षासाठी ठरवावे व ते धोरण शेतमालावर - बाजारपेठेवर थेट परिणाम करणारे नको.
३) रोजगार हमी योजनेअंतर्गत शेती विषयक कामे समाविष्ट करावी.
४) शेती पूरक व्यवसायाला चालना देण्याकरिता शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांना सशक्त करावे व त्या अंतर्गत शेतमाल प्रक्रिया उद्योगाला व निर्यातीला चालना द्यावे.
५) शेतकऱ्यांना शेतीपंपा ला 10 HP पर्यंत मोफत वीज द्यावी किवा शेतकऱ्यांचे 100% टक्के शेती पंप सोलर वरती करावी.
6) शेतकरी महिलेला दरमहा 1000/- थेट त्यांच्या खात्यामध्ये अनुदान म्हणून जमा करावे.
७) दोन साखर कारखान्यांमधील 25 किलोमीटरचे अंतर काढावे.
८) अत्यावश्यक वस्तू कायदा रद्द करावा व सर्व शेतमालावरतील निर्बंध काढण्यात यावेत.
९) महायुती सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देऊन ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल महायुतीचे हार्दिक अभिनंदन.
१०) मुलींच्या उच्च शिक्षणाच्यादृष्टीने राज्य सरकारने जवळपास 600 कोर्सेससाठी १००% फी माफ केल्याबद्दल महायुतीचे हार्दिक अभिनंदन.
११) हातकणंगले लोकसभेची जागा रयत क्रांती संघटनेला देण्यात यावी.
१२) महायुतीतील घटक पक्ष म्हणून रयत क्रांती संघटनेला सत्तेचा वाटा मिळावा.
१३) "फिर एक बार मोदी सरकार" - पुन्हा एकदा आदरणीय नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत रयत क्रांती संघटना खांद्यांना खांदा लावून महायुतीच्या सोबत असेल.

Post a Comment
0 Comments