मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
*पुणे : दिनांक : १६ फेब्रुवारी २०२४ :* यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी स्किल सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान (PMKUVA) अंतर्गत केटरिंग व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा पूर्ण झालेल्या तसेच सर्वाधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचे प्रोडक्शन डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख.श्री.सचिन भंडारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान (PMKUVA) अंतर्गत मोफत असलेल्या चार महिन्याच्या या कोर्समध्ये विद्यार्थ्यांनी ट्रॅडिशनल स्नॅक्स ( पारंपरिक पदार्थ ) अँड सेव्हरी मेकर कोर्स यांचे धडे घेत प्रशिक्षण कार्यशाळा कालावधी पूर्ण केला. तसेच व्यवसायासाठी आवश्यक असलेले विविध परवाने, बँक कर्ज, उद्योग आधार कसे मिळू शकते,याशिवाय प्रत्यक्ष केटरिंग व्यवसाय सुरु केल्यानंतर व्यवसायाचे मार्केटिंग कसे करावे, यासाठी समाज माध्यमांचा प्रभावीपणे कसा वापर करावा याविषयी विद्यार्थ्यांना आय कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी बोलताना महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचे प्रोडक्शन डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख.श्री.सचिन भंडारी यांनी सांगितले कि, केटरिंग व्यवसाय करताना स्वतःचे वेगळेपण जोपासत ग्राहकांची वेळोवेळी बदलणारी अपेक्षा पूर्ण करण्याचा सातत्याने प्रयत्न करा,असे केल्यास तुम्हाला व्यवसायात हमखास यश मिळेल.
या कार्यशाळेतीळ सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचा व्यवसाय सुरु करताना व्यवसाय स्थिर होईपर्यंत, मार्गर्शन व सहकार्य 'यशस्वी' संस्थेकडून करण्यात येईल असे 'यशस्वी' संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ म्हणाल्या. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशस्वी संस्थेच्या हॉस्पिटॅलिटी ट्रेनिंग सेंटरच्या केंद्र प्रमुख ईशा पाठक यांनी केले.तर आभार प्रदर्शन यशस्वी संस्थेच्या हॉस्पिटॅलिटी ट्रेनिंग सेंटरच्या मोबिलायझर व समुपदेशिका शुभांगी कांबळे यांनी केले.



Post a Comment
0 Comments