Type Here to Get Search Results !

अ‍ॅड. नरिमन यांना मिटसॉगच्या विद्यार्थ्यानी वाहिली श्रध्दांजली मिटसॉगच्या १९ व्या बॅचच्या विद्यार्थ्यांची नुकतीच दिल्ली येथे भेंट

 



मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज



पुणे, दि.२३ फेब्रुवारी: सतत शिकत राहिल्याने ज्ञानाची तीव्र भूक ही शाश्वत वृध्दि आणि उत्कंठेमुळे जीवनाला सतत प्रेरक शक्ती मिळाली. त्यामुळेच वृद्धावस्थेतही मी शारीरिक आणि मानसिक स्तरावर तंदुरूस्त आहे. तसेच विद्यार्थ्यानी नम्रता, लवचिकता आणि ज्ञानाचा पाठपुरावा या सारखे गुण सतत अंगीकारावे. असा सल्ला प्रसिद्ध वकील फली.एस.नरिमन यांनी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या १९व्या तुकडीच्या विद्यार्थ्यांना दिला.

त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, मिटसॉगचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. येथील विद्यार्थ्यांनी १३ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे कायदेतज्ज्ञ फली.एस.नरिमन यांच्या राहत्या घरी भेट घेऊन त्यांच्याशी देशातील विविध कायदे व अन्य विषयांवर चर्चा केली. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग म्हणजे अतिशय दयाळूपणाची झलक दिसत होती. गौरवशाली कारकिर्दी सांगितल्यानंतर त्यांच्यातील नम्रता आणि प्रामाणिकपणा दिसला. एक व्यक्ती म्हणून यशाची उंची गाठली होती. वकीली पेशातील जीवनकाळ उलगडतांना विजय आणि संकटाचे क्षण, आव्हानांत संधी शोधणे, स्पष्ट बोलणे, अनुभवातून शिकत रहाणे या गोष्टीं समोर आल्या. शेवटी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना "फली एस नरिमन: बिफोर द मेमरी फेड्स” या आत्मचरित्राची पुस्तक भेट दिली.




नुकतेच त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्याशी झालेल्या भेटीची आठवण सतत मनात तेवत आहे. खर्‍या सज्जन आणि विद्वान व्यक्तिला निरोप देतांना त्यांचा हा वारसा पुढच्या पिढ्यांसाठी टिकून राहणार आहे. त्यांची प्रेरणा, मार्गदर्शन हे सतत एक आदर्श व्यक्तीमत्व निर्माण करण्यासाठी आहे.



Post a Comment

0 Comments